पाकिस्तानचा पंतप्रधान टोपलं घेऊन भीक मागतो, त्यांच्या भाड्याच्या टट्टूने… माजी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांचा संताप
पुलवामा हल्ल्यानंतर माजी वायुसेना अधिकारी शिवाली देशपांडे यांनी भारताच्या कठोर कारवाईचा अंदाज वर्तवला आहे. पाकिस्तानला या कारवाईचे दीर्घकालीन परिणाम भोगावे लागतील असे त्यांनी म्हटले आहे.

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. आता या हल्ल्यानंतर विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीला केंद्र सकारने सुरक्षा यंत्रणेत चूक झाल्याचे मान्य केले. आता याबद्दल विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. त्यातच आता माजी हवाई दल अधिकारी शिवाली देशपांडे यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे. भारताकडून निश्चितच याबद्दल लष्करी कारवाई होईल आणि ती इतकी कठोर असेल की पाकिस्तानला या कारवाईचे परिणाम कायमस्वरूपी लक्षात राहतील, असे शिवाली देशपांडे म्हणाल्या.
माजी हवाई दल अधिकारी शिवाली देशपांडे यांनी नुकतंच टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल भाष्य केले. पहेलगाममध्ये जे झालं ते भयानक होतं. हा भ्याड हल्ला होता आणि पाकिस्तानच्या भाड्याच्या टट्टूने हा हल्ला केला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने आपले फायर फायटर बोर्डरवर आणून ठेवले. कारण त्यांना भारत उत्तर देईल याची खात्री होती, असे शिवाली देशपांडे म्हणाल्या.
भारताने डिप्लोमॅटिक पावलं उचलली आहे. एक प्रकारे पाकिस्तानचा गळा आपण दाबलेला आहे. सिंधू नदीचा करार रद्द केलेला आहे. त्यामुळे पंजाब आणि सिंध या पाकिस्तानच्या भागांमध्ये भारतातून पाणी जाणार नाही. त्याचे जबरदस्त परिणाम पाकिस्तानवर होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे वाघा बॉर्डरवर जी ड्रिल होत असते. ती ड्रिल ताबडतोब रद्द केली आहे आणि हे उत्तम पाऊल होतं, असेही शिवाली देशपांडे यांनी म्हटले.
त्यांचा पंतप्रधान टोपलं घेऊन भीक मागतो
“पाकिस्तानच्या नागरिकांसाठी SAARC विझा होते ते कॅन्सल केलेले आहे. पाकिस्तानचे राजदूत यांना त्यांच्या देशात परत जायला सांगण्यात आलेला आहे. 48 तासांचा वेळ त्यांना देण्यात आलेला आहे. त्यांच्या सैन्याची जी लोकं होते, अँबेसी होती. त्यांनाही देश सोडायला सांगण्यात आलं, अशी ठोस पावलं भारताने उचललेली आहे. ही ठोस पावलं उचलल्यानंतर पाकिस्तानचा एका दृष्टीने आपण गळा दाबला आहे. तशीही पाकिस्तानची परिस्थिती अशी झाली आहे की ते भीक मागत फिरत आहे त्यांचा पंतप्रधान टोपलं घेऊन भीक मागतो आहे”, असेही शिवाली देशपांडे म्हणाल्या.
पाकिस्तान त्यांचे परिणाम विसरु शकणार नाही
“इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ने पैसे देणे पाकिस्तानला बंद केले. कारण ते सगळे पैसे लोकांच्या भल्यासाठी न वापरता आतंकवाद्यांना ट्रेन करण्यासाठी वापरले जात होते. पाकिस्तान मध्ये इतकी गरिबी आहे की पाकिस्तानच्या नागरिक तसेच ओरडत आहे. पंजाब आणि सिंध प्रांतात जेव्हा ही परिस्थिती होईल तेव्हा पाकिस्तानचं काय होईल याचा विचार केला जाऊ शकतो. मिलिटरी ॲक्शन भारताकडून नक्की होईल आणि ती अशी राहील की जोपर्यंत पाकिस्तान हा राष्ट्र आहे. तोपर्यंत त्याचे परिणाम पाकिस्तान विसरू शकणार नाही” हे निश्चित असल्याचं शिवाली देशपांडेंनी सांगितले.
