हृदयात धस्स झाले…पहलगाम दहशतवादी हल्ल्याने IPL संघ दिल्ली कॅपिटल्सची प्रतिक्रिया, शेअर केली भावनिक पोस्ट
IPL Team Reaction on Pahalgam Attack : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हळहळला. देशाला हदरवणाऱ्या या हल्ल्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर अनेकजण भावना व्यक्त करत आहे. आयपीएल संघाचे दिल्ली कॅपिटल्सने या घटनेवर दुख व्यक्त केले आहे.

IPL team Delhi Capitals reaction on Pahalgam Attack : जम्मू-काश्मीर राज्यातील अनंतनाग जिल्ह्यातील पहिलगामच्या बॅसरनमध्ये मंगळवारी देशाला हदरवणारा दहशतवादी हल्ला झाला. देशाला हदरवणाऱ्या या हल्ल्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर अनेकजण भावना व्यक्त करत आहे. आयपीएल संघाचे दिल्ली कॅपिटल्सने या घटनेवर दुख व्यक्त केले आहे. या हल्ल्यात एकूण 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, ओडिसा या राज्यातील पर्यटक दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे दिसून आले. अजूनही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील पर्यटक या ठिकाणी अडकले आहेत.
दिल्ली कॅपिटल्सने व्यक्त केला शोक
आयपीएल टीम दिल्ली कॅपिटल्सने या घटनेवर तीव्र दुख व्यक्त केले आहे. टीमने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. पहलगाममधील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध आयपीएल संघाने केला आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले पर्यटक, त्यांचे नातेवाईक, कुटुंबिय यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या कठीण प्रसंगात आम्ही त्यांच्या सोबत आहोत असे भावनिक पोस्ट दिल्ली कॅपिटल्सने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
दिल्ली कॅपिटल्सची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टवरील कमेंटमध्ये अनेक जणांनी मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना केली आहे. तर अनेकांनी दहशतवाद्यांना धडा शिकवण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानवर ही अनेकांनी आगपाखड केली आहे. दरम्यान दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन राबवले आहे. तर दहशतवाद्यांनी या भागात पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न केल्याचे नुकत्याच हाती आलेल्या वृत्तात म्हटले आहे. सुरक्षा दलांनी हा प्रयत्न उधळून लावला.
या हा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी लष्कर ए तैयबाची एक संघटना द रेजिस्टेंस फ्रंट TRF या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. या संघटनेच्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला. हिंदू पर्यटकांची ओळख पटवून त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना टार्गेट केले. या हल्ल्यावेळची छायाचित्र आणि व्हिडिओ थरकाप उडवणारी आहेत.
