Pahalgam Attack : हातावर मेहंदी, चुडा आणि चेहऱ्यावर वेदना … आठवड्याभरापूर्वीच लग्न झालेल्या नववधून सगळं गमावलं..
Pahalgam Terror Attack : पहलगाम येथे दहशतवाद्यांनी अगोदर या परिसराची रेकी केली. त्यानंतर त्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात भारतीय नौसेनेचे लेफ्टनंट विनय नरवाल हे शहीद झाले. या हल्ल्यात त्यांची पत्नी वाचली.

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी अगोदर या परिसराची रेकी केली. त्यानंतर त्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. यामध्ये भारतीय नौसेनेचे लेफ्टनंट विनय नरवाल हे शहीद झाले. या हल्ल्यात एकूण 26 लोक मारल्या गेले. त्यात महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, ओडिसासह इतर राज्यातील पर्यटकांचा मृत्यू झाला. तर अनेक पर्यटक या ठिकाणी अडकून पडले आहेत. तर त्यातील अनेक पर्यटक सुखरूप असल्याची माहिती समोर येत आहे.
हरियाणातील करनाल येथील रहिवाशी
विनय नरवाल हे करनाल येथील सेक्टर 7 मध्ये राहणारे होते. दोन वर्षांपूर्वीच ते नौदलात रूजू झाले होते. विनय सोमवारी श्रीनगर येथे फिरायला गेले होते. या हल्ल्यात त्यांची पत्नी वाचली. हे जोडपे सोमवारी श्रीनगर येथे पोहचले. तेथून ते पहलगाम येथे फिरायला गेले होते. या घटनेनंतर त्यांच्या पत्नीचा, पतीच्या मृतदेहाशेजारी बसलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यांचे कुटुंब करनाल येथील येथील सेक्टर 7 मध्ये राहते. त्यांच्या मृत्यूची वार्ता कळताच त्यांच्या कुटुंबातील सदस्य श्रीनगरकडे रवाना झाले आहे.
आम्ही भेलपूरी खात होतो
आम्ही या ठिकाणी भेलपूरी खात होतो. त्यावेळी हातात बंदुक घेऊन व्यक्ती आला. त्याने माझ्या पतीला तू मुसलमान आहे का अशी विचारणा केली. मुसलमान नाही आहे, हे समजताच त्याने गोळी मारली, थरथरत्या आवाजात नरवाल यांच्या पत्नीने आपबित्ती सांगितली. तर हैदराबाद येथील IB चे एक अधिकारी मनिष रंजन हे सुद्धा मंगळवारी काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. त्यांची मुलं आणि पत्नीसमोरच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. हल्ल्याच्या काही वेळ अगोदरच हे कुटुंब तिथे पोहचले होते.
माझ्या पतीला वाचवा
घटनास्थळावरून अजून एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात एक महिला रडताना दिसत आहे. ती मदतीसाठी विनंती करत आहे. पण हुंदके आणि भावना दाटून आल्याने तिचा आवाज क्षीण जाणवतो. माझ्या पतीला वाचवा अशी विनंती ती करत आहे. तर शेजारीच तिचा पती रक्ताच्या थारोळ्यात दिसत आहे. तर दुसऱ्या एका व्हिडिओत सुद्धा एक महिला मदत मागताना दिसत आहे. हा दहशतवादी हल्ला लष्कर ए तैयबाची एक संघटना द रेजिस्टेंस फ्रंट TRF ने घेतली आहे.
