पाकिस्तानने बंद केली एअरस्पेस, भारताकडे पर्याय काय? पाकिस्तानला बसणार किती फटका?
Pakistan Airspace closed: दिल्ली, जयपूर, लखनऊ, चंदीगढ, अमृतसरमधून अमेरिका, युरोप, पश्चिम आशियाला जाणाऱ्या विमानांना फेऱ्याच्या मार्गाने जावे लागणार आहे. या शहरांमधून जाणारी विमाने आता महाराष्ट्र आणि गुजरातच्या मार्गाने जातील.

काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणाव वाढत आहे. दोन्ही देशांनी एकमेकांचा हवाई मार्ग एक दुसऱ्यासाठी बंद केला आहे. त्यामुळे भारतीय आणि पाकिस्तानी विमानांना वळसा घेऊन दुसऱ्या देशांमध्ये जावे लागणार आहे. त्याचा परिणाम वेळ अधिक लागणार असून विमान कंपन्यांचा खर्चही वाढणार आहे.
पाकिस्तानचा हवाई मार्ग बंद झाल्यामुळे भारतीय विमानांना दुसऱ्या देशांमध्ये जाण्यासाठी लांबचा मार्गाने प्रवास करावा लागणार आहे. सौदी अरेबिया, युएई, ओमान आणि कतारसारख्या आखाती देशांसाठी पाकिस्तानमधून जाणारा हवाई मार्ग चांगला होता. या मार्गाने जाण्यास वेळ कमी लागत होता. आता सौदी अरेबिया जाण्यासाठी मुंबईतील अरब सागराचा मार्ग असणार आहे.
पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे एअर इंडिया, इंडिगो सारख्या सर्व भारतीय विमान कंपन्यांना उत्तर अमेरिका, ब्रिटन, युरोप आणि मध्य पूर्वेकडे जाण्यासाठी लांबच्या मार्गांनी उड्डाण करावे लागणार आहे. त्यामुळे वेळ जास्त लागणार असून विमानांना इंधनही जास्त लागेल. अफगाणिस्तानमधील काबुलमधील नवी दिल्लीत येणाऱ्या विमानांना आता इराणमधील अरब सागराचा मार्गाचा वापर करत दिल्लीत यावे लागेल. हा मार्ग 913 किलोमीटर लांब होणार आहे.
दिल्ली, जयपूर, लखनऊ, चंदीगढ, अमृतसरमधून अमेरिका, युरोप, पश्चिम आशियाला जाणाऱ्या विमानांना फेऱ्याच्या मार्गाने जावे लागणार आहे. या शहरांमधून जाणारी विमाने आता महाराष्ट्र आणि गुजरातच्या मार्गाने जातील. यापूर्वी 2019 मध्ये भारताने कश्मीरमधील कलम 370 रद्द केले होते. त्यावेळीही पाकिस्तानने हवाई मार्ग बंद केला होता. भारतीय विमान कंपन्यांचे 700 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. भारताने पाकिस्तानला हवाई मार्ग बंद केल्यानंतर पाकिस्तानच्या विमान कंपन्यांचे 400 कोटी रुपयांचे नुकसान झाले.
एअर इंडियाची अनेक आंतरराष्ट्रीय लांब पल्ल्याच्या विमाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून उड्डाण करतात. या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम एअर इंडियावर होईल. आता कंपनीने त्यांच्या काही उड्डाणांसाठी पर्यायी मार्गांची घोषणा केली आहे. इंडिगो आणि स्पाइसजेट तसेच मध्य पूर्व आणि इतर पाश्चात्य देशांना जाणाऱ्या इतर खाजगी विमान कंपन्यांच्या विमान उड्डाणांवर परिणाम होईल. ऑपरेशनल खर्चात वाढ झाल्यामुळे विमानांचे तिकीट महाग होणार आहे.
