पहलगामचा बदला, PoK भारतात आणण्याची योजना, पाकिस्तानात भारताची दहशत
Pahalgam Terror Attack: पीओकेमध्ये दहशतवाद्यांसाठी किमान १७ प्रशिक्षण केंद्रे आणि ३७ मोठे लाँचिंग पॅड आहेत. या छावण्यांमध्ये पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांचे सैन्य दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहे.

पहलगामवरील दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या २६ पर्यटकांच्या हत्येच्या बदला घेण्याची मागणी होत आहे. यामुळे भारत पाकिस्तानवर मोठी कारवाई करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याबाबतचे संकेतही दिले. भारतीय सैन्य पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK ) थेट लष्करी कारवाई करू शकते. त्यासाठी भारताची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे हल्ल्याच्या तयारीत आहेत. मोठ्या कारवाईपूर्वी उत्तर भारतातील एका भागाचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे.
पीओके हा दहशतवादाचा गड आहे. सर्व दहशतवादी लाँच पॅड पीओकेमध्ये आहेत. दहशतवाद्यांचे हे लाँच पॅड उद्धवस्थ करण्याची योजना भारताची आहे. भारताच्या गुप्तचर संस्था आणि लष्कराला पीओकेमधील प्रत्येक दहशतवादी लाँच पॅडची संपूर्ण माहिती मिळाली आहे. पीओकेमध्ये दहशतवाद्यांसाठी किमान १७ प्रशिक्षण केंद्रे आणि ३७ मोठे लाँचिंग पॅड आहेत. या छावण्यांमध्ये पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांचे सैन्य दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहे.
पीओकेच्या कोणत्या भागात दहशतवाद्यांचे किती लाँच पॅड आहेत? त्यांची नाव काय आहे? त्याचा पत्ता काय आहे? हे उघड झाले आहे. पाकिस्तानी सैन्य दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यापूर्वी रेकी करणेही शिकवत असते. पीओकेमधील दहशतवादी घुसखोरीसाठी पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने कशी रेकी करतात त्याचा हा पुरावा आहे. दहशतवाद्यांच्या ३७ लाँच पॅडपैकी २० लाँच पॅड पीओकेमध्ये आहेत. कुठे कोणते लाँचपॅड आहेत, पाहू या…
1.दुदनियाल
2.अब्दुल बिन मसूद
3.चेलाबंदी
4.मनस्ताय
5.देवलियान
6.घडी दुपट्टा
7.सफैदा
8.हलन सुलामी
9.बाग
10.अलियाबाद
11.फॉरवर्ड कहुटा
12.रावला बंदरगाह
13.डूंगी
14.तत्ता पानी
15.हजीरा
16.सेंसा
17.कोटली
18.निकल
19.पलानी
20. बरला
पाकिस्तानी सेना प्रशिक्षण देऊन या भागातून दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास मदत करते. हा भाग दुर्गम आहे. या भागात जंगल आहे. पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तान लष्कराने प्रशिक्षण दिले होते. त्यासंदर्भातील पुरावे भारतीय सुरक्षा संस्थांना मिळाले आहे. पाकिस्तानी लष्कराला पहलगाव हल्ल्याची माहिती होती. अनेक दिवस त्यासाठी तयारी केली गेली होती.
