pakistan social media banned | पाकिस्तानमध्ये फेसबुक, इन्टाग्राम, टेलिग्राम, टिकटॉक सगळं बंद; कारण काय ?

| Updated on: Apr 16, 2021 | 6:32 PM

पाकिस्तानने (Pakistan) संपूर्ण देशात शुक्रवारी फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉकवर बंदी घातली आहे. पाकिस्तानी गृहमंत्रालयाने तसे आदेश काढले आहेत. (pakistan social media mohammad paigambar cartoons)

pakistan social media banned | पाकिस्तानमध्ये फेसबुक, इन्टाग्राम, टेलिग्राम, टिकटॉक सगळं बंद; कारण काय ?
PAKISTAN SOCIAL MEDIA IMRAN KHAN
Follow us on

इस्लामाबाद : पाकिस्तानने (Pakistan) संपूर्ण देशात सर्व सोशल मीडिया अ‌ॅप्सवर तात्पुरत्या स्वरुपात बंदी घातली. येथे शुक्रवारी (16 एप्रिल) फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉक, टेलिग्राम आदी सगळं काही बंद करण्यात आले आहे.  पाकिस्तानी गृहमंत्रालयाने तसे आदेश काढले आहेत. मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन अथॉरिटीने (PTA)सर्व समाजमाध्यमं बंद केली आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेस धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानने हा निर्णय घेतला. (Pakistan government banned social media Facebook Instagram Twitter Tiktok Telegram due to Mohammad Paigambar cartoons and protest)

फ्रान्सविरोधात नागरिकांचा रोष

मिळालेल्या माहितीनुसार तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (TLP) या धार्मिक संघटनेच्या लोकांमध्ये फ्रान्सबदद्ल रोष आहे. याच रोषापोटी पाकिस्तानमध्ये ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. फ्रान्समध्ये मोहम्मद पैगंबर यांचे कार्टून प्रकाशित केल्यामुळे हे आंदोलन सुरु आहे. तसेच या आंदोलनाचा एक भाग म्हणून फ्रान्सच्या राजदुतांनीसुद्धा पाकिस्तान सोडून जावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून होत आहे. हे आंदोलन संपूर्ण पाकिस्तानमध्ये पसरले आहे. त्यामुळे सामाजिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी पाकिस्तानमध्ये सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज (16 एप्रिल) दुपारी 3 वाजेपर्यंत ही बंदी घालण्याचे आदेश होते. मात्र, अद्याप पाकिस्तानमधील सोशल मीडिया सुरळीत केले किंवा नाही, याबद्दल समजू शकले नाही.

बंदी घातलेल्या संघटनेचा आंदोलनात मुख्य सहभाग

पाकिस्तानी लोकांमध्ये फ्रान्सबद्दल रोष आहे. वेगवेगळ्या धार्मिक संघटना फ्रान्सविरुद्ध आंदोनल करत आहेत. यामध्ये तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (TLP) या संघटनेचा मुख्य सहभाग आहे. या संघटनेवर पाकिस्तामध्ये बंदी घालण्यात आलेली आहे. मुळात फ्रान्समध्ये मोहम्मद पैगंबर यांचे कार्टून बनवल्यामुळे पाकिस्तानमध्ये फ्रान्सविरोधात एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे. दरम्यान, मिळालेल्या ताज्या माहितीनुसार या आंदोलनात आतापर्यंत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून नागरिकांचा फ्रान्सविरोधातील रोष कायम असून अजूनही येथे आंदोलन सुरुच आहे.

इतर बातम्या :

कोरोनाबाधित आईनं बाळाला दूध पाजलं आणि पुढं जे घडलं ते काळीज पिळवटणारं

जगभरात राहणाऱ्या भारतीयांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय! पासपोर्टबाबत बदलला हा नियम

Mahakumbh 2021 | सर्वात मोठ्या दोन नंबरच्या आखाड्याच्या प्रमुखाचं कोरोनाने निधन, 68 टॉपचे साधू संत कोरोनाच्या विळख्यात, कुंभात कोरोनाचा स्फोट

(Pakistan government banned social media Facebook Instagram Twitter Tiktok Telegram due to Mohammad Paigambar cartoons and protest)