AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी पाकिस्तान दहा वेळा विचार करावा लागणार, भारताला मिळाले हे ब्रह्मास्त्र, असे बदलले समीकरण

atomic bomb: भारताने मागील आठवड्यात हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. त्यानंतर जगातील मोजक्या देशांच्या पगंतीत भारत जाऊन बसला. या क्षेपणास्त्राचा टप्पा 1500 किमी आहे. त्यात संपूर्ण पाकिस्तान येऊ शकते.

भारताला अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी पाकिस्तान दहा वेळा विचार करावा लागणार, भारताला मिळाले हे ब्रह्मास्त्र, असे बदलले समीकरण
atomic bomb
| Updated on: Nov 19, 2024 | 11:23 AM
Share

भारत आणि पाकिस्तान हे दोन देश एकाच वेळी स्वातंत्र झाले. परंतु या दोन्ही देशांमध्ये सलोखा निर्माण होऊ शकला नाही. पाकिस्तान भारताला अडचणीत आणण्याचे सातत्याने प्रयत्न करत असतो. परंतु प्रत्येक वेळा पाकिस्तानला मार खावे लागते. दोन्ही देश अण्वस्त्र संपन्न राष्ट्र आहे. भारताने प्रथम अण्वस्त्र न वापरण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे. परंतु पाकिस्तानमधून अण्वस्त्र हल्लाची धमकी अधूनमधून दिली जाते. आता भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देण्यापूर्वी पाकिस्तानला दहा वेळा विचार करावा लागणार आहे. कारण भारताला आता एक ‘ब्रह्मास्‍त्र’ मिळाले आहे. त्या ‘ब्रह्मास्‍त्र’ला नाव आहे हायपरसोनिक मिसाइल. रशिया, चीन, अमेरिकेनंतर हे आता भारताकडे आले आहे.

भारताने मागील आठवड्यात हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. त्यानंतर जगातील मोजक्या देशांच्या पगंतीत भारत जाऊन बसला. या क्षेपणास्त्राचा टप्पा 1500 किमी आहे. त्यात संपूर्ण पाकिस्तान येऊ शकते. हायपरसोनिक स्पीडने हे क्षेपणास्त्र पाकिस्तानातील कोणत्याही भागात सहज हल्ला करु शकते. तसेच हायपरोसोनिक स्पीडमुळे हे क्षेपणास्त्र एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करु शकते. त्यामुळेच त्याला भारताचे ब्रह्मास्‍त्र म्हटले जात आहे. युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाने त्याचा यशस्वी वापर केला आहे.

पाकिस्तानला आता धमकी देता येणार नाही

आंतराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ सांगतात, भारताच्या या यशानंतर पाकिस्तानी लष्कार भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देऊ शकणार नाही. पाकिस्तानी सेना आणि काही राज्यकर्ते अशी धमकी देत राहतात. नुकतेच पाकिस्तानी लष्कारातील निवृत्त उच्चाधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तान ‘नो फर्स्‍ट यूज’ धोरणावर विश्वास ठेवत नाही. राष्ट्रहित पाहून पाकिस्तान आधी हल्ला करु शकतो.

सर्व गणित असे बदलले

पाकिस्तान सतत आपल्या अणुबॉम्बची संख्या वाढवत आहे. आता ती 170 वर पोहोचली आहे. भारताकडे 172 अणुबॉम्ब आहेत. भारताने हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्यानंतर पाकिस्तानी लष्कराच्या या हालचालींवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हायपरसॉनिक क्षेपणास्त्रामुळे भारत आणि पाकिस्तानमधील कोणत्याही युद्धाचे संपूर्ण समीकरणच बदलून जाईल. भारताची क्षेपणास्त्रे हवेतच पाडता यावीत यासाठी पाकिस्तानने चीनकडून हवाई संरक्षण यंत्रणा खरेदी केली आहे. ही हवाई संरक्षण यंत्रणा केवळ कमी वेगाने होणारी क्षेपणास्त्रे रोखू शकते. भारताच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्र ते रोखू शकणार आहे. त्यामुळे आता सारे गणितच बदलले आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.