UPSC परीक्षेतून नाही तर बिजनेस स्कूलमधून निवडा IAS-IPS, नारायणमूर्ती यांचा नेमका काय सल्ला?

NR Narayana Murthy: यूपीएससीमधील सध्याचा पॅटर्न हा 1858 मध्ये तयार करण्यात आला होता. त्यामध्ये आता बदल करण्याची गरज आहे. लोकांची मानसिकता बदलण्याची अपील करत त्यांनी म्हटले, मला आशा आहे की भारत केवळ प्रशासन प्रमुख व्यवस्थेमध्ये न राहता व्यवस्थापनाभिमुख व्यवस्थेत असेल.

UPSC परीक्षेतून नाही तर बिजनेस स्कूलमधून निवडा IAS-IPS, नारायणमूर्ती यांचा नेमका काय सल्ला?
Narayana Murthy
Follow us
| Updated on: Nov 19, 2024 | 7:01 AM

NR Narayana Murthy Suggestion: संघ लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) घेण्यात येणारी आयएएस आणि आयपीएसची परीक्षा देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. या परीक्षेसाठी लाखो तरुण तयारी करतात. परंतु यश मात्र मोजक्या लोकांना मिळणार आहे. इन्फोसिस कंपनीचे सहसंस्थापक एन.आर.नारायण मूर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला दिला आहे. आयएएस आणि आयपीएसची निवड यूपीएससीकडून नाही तर मॅनेजमेंट स्कूलमधून करावी, असे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर देशाची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जाईल. दोन दिवासांपूर्वी 70 तास काम करण्याच्या वक्तव्यावर आपण अजूनही ठाम असल्याचे नारायण मूर्ती यांनी सांगितले होते.

काय आहे नारायणमूर्ती यांचा सल्ला

नारायण मूर्ती यांनी म्हटले की, बिझनेस स्कूल किंवा मॅनेजमेंट स्कूलमधून ज्या उमेदवारांची निवड करण्यात येईल, त्यांना मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री अकादमीत प्रशिक्षण दिले जावे. त्या ठिकाणी त्यांना कृषी, संरक्षण, उत्पादन या क्षेत्रासंदर्भात प्रशिक्षण दिले जावे. यामुळे सामान्य प्रशासक बनवण्याच्या विद्यामान पद्धतीपेक्षा हे सर्व वेगळे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अर्थव्यवस्थेला वेग देण्यासाठी भरीव काम केले आहे. त्यामुळे आता सरकारमध्ये प्रशासकाऐवजी मॅनेजर हवे का? या बाबत विचार करण्याची गरज आहे.

सरकारने आयएएस, आयपीएससाठी सध्या प्रणाली ऐवजी मॅनेजमेंट स्कूलचा वापर करायला हवा. सध्याच्या प्रणालीत यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याची निवड होते. त्यानंतर त्यांना मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीत प्रशिक्षण दिले जाते. परंतु मॅनेजमेंट स्कूलमधील विद्यार्थ्यांना विशेषज्ञ बनवता येईल. त्यानंतर पुढील 30-40 वर्ष तो संबंधित क्षेत्रात देशाची सेवा करु शकेल.

हे सुद्धा वाचा

यूपीएससीमधील सध्याचा पॅटर्न हा 1858 मध्ये तयार करण्यात आला होता. त्यामध्ये आता बदल करण्याची गरज आहे. लोकांची मानसिकता बदलण्याची अपील करत त्यांनी म्हटले, मला आशा आहे की भारत केवळ प्रशासन प्रमुख व्यवस्थेमध्ये न राहता व्यवस्थापनाभिमुख व्यवस्थेत असेल. मंत्रिमंडळाच्या पातळीवरील समित्यांचे अध्यक्ष म्हणून आणि प्रत्येक प्रमुख निर्णयासाठी मंत्र्यांची आणि नोकरशहांची नियुक्ती करण्याची सूचना नारायणमूर्ती यानी केली.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.