AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narayana Murthy: माफ करा, मी माझा दृष्टिकोन बदलू शकत नाही…नारायण मूर्ती आपल्या त्या वक्तव्यावर ठाम

Narayana Murthy: नारायण मूर्ती यांनी देशातील दुसऱ्या क्रमांकाची सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसची स्थापना 1981 मध्ये केली होती. तेव्हापासून 2002 पर्यंत तेच कंपनीचे सीईओ होते. त्यानंतर 2002 ते 2006 पर्यंत ते चेअरमन होते.

Narayana Murthy: माफ करा, मी माझा दृष्टिकोन बदलू शकत नाही...नारायण मूर्ती आपल्या त्या वक्तव्यावर ठाम
Narayana Murthy
| Updated on: Nov 17, 2024 | 10:02 AM
Share

देशातील आदर्श व्यक्तीमत्व आणि इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी पुन्हा एकदा देशातील युवकांना मार्गदर्शन केले आहे. त्यांनी 70 तास काम करण्याच्या वक्तव्यावर आपण अजूनही ठाम असल्याचे सांगितले. “मला माफ करा, मी माझा दृष्टिकोन बदललेला नाही. मी हा दृष्टिकोन माझा सोबतच घेऊन जाईन,” असे नारायण मूर्ती यांनी म्हटले आहे. सीएनबीसी ग्लोबल लीडरशिप समिटमध्ये बोलताना त्यांनी आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला.

70 तास काम करण्याचा सल्ला

1986 मध्ये भारतात सहा दिवसांच्या आठवड्याऐवजी पाच दिवसांचा आठवडा करण्यात आला होता. त्यावर नारायण मूर्ती यांनी नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले, कठोर परिश्रम हा राष्ट्रीय प्रगतीचा पाया आहे. भारताच्या विकासासाठी आरामाची नाही तर त्यागाची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवड्यात 100 तास काम करतात. जेव्हा पंतप्रधान इतके काम करतात तेव्हा आमच्याजवळच्या लोकांनी त्या पद्धतीने काम करायला हवे. नारायण मूर्ती यांनी मागील वर्षी युवकांना आठवड्यात 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यावरुन वाद निर्माण झाला होता. काही जणांनी त्यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला होता. मात्र अनेकांनी विरोध केला होता. सोशल मीडियावर त्यांना ट्रोलही करण्यात आले होते. 70 तास काम केल्यानंतर लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल, असे काही जणांचे म्हणणे होते.

नारायण मूर्ती यांनी दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जर्मनी आणि जपानचे उदाहरण दिले. जर्मनी आणि जपानमधील लोकांनी त्या देशांच्या पुनर्बांधणीसाठी हेच केले आहे. यामुळे भारतीय तरुणांनी असे करणे स्वतःचे आणि देशाचे ऋण फेडण्यासारखे आहे.

नारायण मूर्ती यांनी देशातील दुसऱ्या क्रमांकाची सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसची स्थापना 1981 मध्ये केली होती. तेव्हापासून 2002 पर्यंत तेच कंपनीचे सीईओ होते. त्यानंतर 2002 ते 2006 पर्यंत ते चेअरमन होते. ऑगस्ट 2011 मध्ये ते निवृत्त झाले. त्यानंतर पुन्हा 2013 मध्ये एग्जिक्यूटिव्ह चेअरमन म्हणून त्यांची कंपनीत एन्ट्री झाली होती.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.