
RSS Sunil Ambekar : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गुरुवारी काँग्रेसच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. जयराम रमेश यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संघावर गंभीर आरोप केला आहे. त्यानुसार, अमेरिकेत आपले हितसंबंध वृद्धिंगत करण्यासाठी, प्रतिमा उजळवण्यासाठी संघाने पाकिस्तानच्या अधिकृत लॉबिंग एजन्सींजीची मदत घेतल्याचा आरोप केला आहे. या आरोपाने संघ परिवारातही खळबळ उडाली आहे. हे आरोप संघाने फेटाळले आहेत. आरएसएसचे राष्ट्रीय मीडिया आणि प्रचार विबागाचे प्रमुख सुनील आंबेकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी काँग्रेसला सडेतोड उत्तर दिले आहे.
आमचं काम भारतात, अमेरिकेत नाही
काँग्रेसचे जयराम रमेश यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ हा अमेरिकेत लॉबिंग करत आहे. त्यासाठी संघाने पाकिस्तानच्या अधिकृत लॉबिंग एजन्सींजला काम दिल्याचा खळबळजनक दावा केला. संघ भारताशी विश्वासघात करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्याची देशभरात एकाच चर्चा होत आहे. त्यानंतर सुनील आंबेकर यांनी या आरोपांना थेट उत्तर दिले. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ हा भारतात काम करतो. संघाने अमेरिकेत कोणत्याही लॉबिंग फर्मला काम दिलेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
RSS कर सुद्धा भरत नाही
काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी संघ ही नोंदणीकृत संघटना नाही आणि ती कर भरत नाही असे विधान केल्याचा दावा काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी केला होता. त्यांनी एक्सवर याविषयीची पोस्ट केली. तर या पोस्टमध्येच त्यांनी अमेरिकेत आपले हितसंबंध वाढवण्यासाठी संघाने पाकिस्तानच्या लॉबिंग फर्मला मोठी रक्कम मोजल्याचा आरोप जयराम रमेश यांनी केला. अमेरिकेतील विधी क्षेत्रात काम करणारी कंपनी स्क्वॉयर पॅटन बोग्स (SPB) या संस्थेला संघाने हे काम दिल्याचा आरोप त्यांनी केला.
“Rashtriya Swayamsevak Sangh works in Bharat and has not engaged any lobbying firm in United States of America”
– Sunil Ambekar
Akhil Bharatiya Prachar Pramukh , RSS@editorvskbharat— Sunil Ambekar (@SunilAmbekarM) November 13, 2025
रमेश यांनी पोस्टमध्ये शेअर केला स्क्रीनशॉट
जयराम रमेश यांनी एक स्क्रीनशॉटही शेअर केला. त्यात अमेरिकेन सिनेटमध्ये लॉबिंगचा खुलासा करण्यात आला आहे. स्क्वायर पॅटन बोग्सने आरएसएससाठी लॉबिस्ट म्हणून नोंदणी केल्याचे यामध्ये दाखवण्यात आले आहे. या आरोपामुळे देशात खळबळ उडाली आहे. एकीकडे पाकवर आगपाखड करायची आणि दुसरीकडे त्याच्या देशाच्या फर्मला अमेरिकेत कामाला लावल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.