Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हनीट्रॅपमध्ये अडकला हा व्यक्ती, गगनयान प्रोजेक्ट अन् ड्रोनची माहिती पाकिस्तानच्या ISI ला केली शेअर

Agra Two ISI Agents Arrested: रवींद्रकुमार याच्या मोबाईलमध्ये महत्वाची माहिती मिळाली आहे. त्यात ऑर्डनन्स फॅक्टरीतील गोपनीय कागदपत्रांचा समावेश आहे. यामध्ये 51 गोरखा रायफल्सच्या अधिकाऱ्यांशी संबंधित माहिती आणि लॉजिस्टिक ड्रोनच्या चाचणीचाही समावेश आहे.

हनीट्रॅपमध्ये अडकला हा व्यक्ती, गगनयान प्रोजेक्ट अन् ड्रोनची माहिती पाकिस्तानच्या ISI ला केली शेअर
pakistan isi honey trap
Follow us
| Updated on: Mar 15, 2025 | 3:17 PM

Pakistan ISI Honey Trap: डीआरडीओचे तत्कालीन संचालक प्रदीप कुरुळकर वर्षभरापूर्वी पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI च्या हनिट्रॅपमध्ये अडकला होता. प्रदीप कुरुळकर यांनी संवेदनशील माहिती पाकिस्तानी एजंटला दिल्याचा प्रकार उघड झाला होता. त्यानंतर आता पुन्हा संरक्षण दलाशी संबंधित विभागातील एक कर्मचारी पाकिस्तानच्या हनिट्रॅपमध्ये अडकला आहे. हा व्यक्ती ऑर्डनन्स फॅक्टरीत चार्जमॅन आहे. त्याने गगनयान प्रोजक्ट आणि ड्रोनची माहिती पाकिस्तानच्या आयएसआयला पुरवली आहे. त्याला उत्तर प्रदेशातील एंटी टेररिस्ट क्सक्वॉडने अटक केली आहे.

सोशल मीडियातून मैत्री

उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) फिरोजाबादमधील ऑर्डनन्स फॅक्टरी चार्जमन रवींद्र कुमार आणि त्याच्या एका साथीदाराला आग्रा येथून अटक केली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला गुप्त लष्करी आणि वैज्ञानिक माहिती पाठवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.रवींद्रकुमार हा पाकिस्तानी महिलेच्या हनीट्रॅपमध्ये अडकल्याचे तपासातून समोर आले. पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या महिला एजंटने सोशल मीडियाच्या माध्यमातून रवींद्रकुमार याच्याशी मैत्री केली. त्यानंतर त्याच्याकडून संवेदनशील माहिती घेऊ लागली. तिच्या जाळ्यात रवींद्रकुमार चांगलाच अडकला.

नेहा शर्मा सांगितले नाव

पाकिस्तीनी आयएसआय एजंटने रवींद्रकुमार याला तिचे नाव नेहा शर्मा सांगितले. तिने फेसबुकवर बनावट खाते तयार करुन रवींद्रकुमार याला फसवले. त्यानंतर पैसांची लालच देवून रवींद्र कुमार याला फसवत राहिली. रवींद्रकुमार याने ऑर्डनन्स फॅक्टरी फिरोजाबादशी संबंधित अनेक गोपनीय कागदपत्रे तिला म्हणजेच पाकिस्तानला पाठवली होती. यामध्ये आयुध कारखान्याच्या दैनंदिन उत्पादन अहवालाचाही समावेश आहे. याशिवाय त्याने स्क्रीनिंग कमिटीची गोपनीय पत्रेही लीक केली होती. तसेच ड्रोन आणि गगनयान प्रकल्पाशी संबंधित महत्त्वाची माहिती लीक केली आहे.

हे सुद्धा वाचा

रवींद्रकुमार याच्या मोबाईलमध्ये महत्वाची माहिती मिळाली आहे. त्यात ऑर्डनन्स फॅक्टरीतील गोपनीय कागदपत्रांचा समावेश आहे. यामध्ये 51 गोरखा रायफल्सच्या अधिकाऱ्यांशी संबंधित माहिती आणि लॉजिस्टिक ड्रोनच्या चाचणीचाही समावेश आहे. ही संवेदनशील माहिती त्याने व्हॉट्सॲपवरूनही शेअर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.