AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pan Masala Ban Rule : पान मसाल्याच्या प्लास्टिक पॅकिंगवर बंदी, या तारखेपासून नवा नियम लागू; नेमकं काय बदलणार?

नव्या नियमांनुसार पान मसाल्याच्या पॅकिंगसाठी पॉलीएथिलीन, पॉलीप्रोपिलीन, पॉलीएस्टर, PVC तसेच इतर सिंथेटिक पॉलिमर आणि लॅमिनेटचा वापर करता येणार नाही.

Pan Masala Ban Rule : पान मसाल्याच्या प्लास्टिक पॅकिंगवर बंदी, या तारखेपासून नवा नियम लागू; नेमकं काय बदलणार?
paan masalaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 11, 2026 | 8:51 PM
Share

Pan Masala Packaging Rules : पान मसाला सेवन करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात FSSAI ने पान मसाल्याच्या पॅकेजिंगसंदर्भातील नियम अधिक कडक केले आहेत. नव्या नियमांनुसार पान मसाला उत्पादनांच्या पॅकिंगमध्ये प्लास्टिक किंवा काही प्रकारच्या सिंथेटिक साहित्याचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हे बदल 10 ऑगस्ट 2026 पासून लागू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

नव्या नियमांनुसार पान मसाल्याच्या पॅकिंगसाठी पॉलीएथिलीन, पॉलीप्रोपिलीन, पॉलीएस्टर, PVC तसेच इतर सिंथेटिक पॉलिमर आणि लॅमिनेटचा वापर करता येणार नाही. याशिवाय अॅल्युमिनियम फॉइल आणि मेटलाइज्ड लेयरच्या वापरावरही निर्बंध असतील. त्यामुळे पान मसाला उत्पादक कंपन्यांना पॅकेजिंगची पद्धत बदलावी लागणार आहे.

आता कशा प्रकारचे पॅकेजिंग दिसणार?

प्लास्टिक आणि अॅल्युमिनियम फॉइलला पर्याय म्हणून पर्यावरणपूरक साहित्य वापरण्यावर भर दिला जाणार आहे. FSSAIच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पेपर, पेपर बोर्ड, सेलुलोज, टिन किंवा काचेच्या डब्यांचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात बाजारात पान मसाल्याच्या पॅकिंगमध्ये मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

पान मसाला महागणार का?

नव्या पॅकेजिंग नियमांचा थेट परिणाम उत्पादन खर्चावर होण्याची शक्यता आहे. कंपन्यांना नवीन पॅकेजिंग साहित्य तसेच त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची व्यवस्था करावी लागणार आहे. कागद, टिन किंवा काच यांसारख्या पर्यायी साहित्याचा खर्च तुलनेने अधिक असल्यास उत्पादनाचा खर्च वाढू शकतो. त्यामुळे भविष्यात पान मसाल्याच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय नुकसान होऊ शकतं?

दरम्यान, प्लास्टिकऐवजी इतर साहित्य वापरल्यामुळे उत्पादनाची सेल्फ लाइफ, वाहतूक आणि साठवणूक याबाबतही कंपन्यांना नव्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. वाहतुकीदरम्यान पॅकेजिंग खराब होऊन उत्पादनाचे नुकसान होण्याचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा