नेहरुंचा सरकारी बंगला विक्रीला, किंमत ऐकाल तर चाट पडाल, कोण विकत घेणार ?

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचे पहिले अधिकृत निवासस्थान असलेला बंगला विक्रीला निघाला आहे. दिल्लीच्या अत्यंत उच्चभ्रू लुटीयन्स झोनमधील हा बंगला 3.7 एकरवर पसरलेला आहे. ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी निवासी प्रॉपर्टी डील मानली जात आहे.

नेहरुंचा सरकारी बंगला विक्रीला, किंमत ऐकाल तर चाट पडाल,  कोण विकत घेणार ?
Pandit Jawaharlal Nehru
| Updated on: Sep 03, 2025 | 9:42 PM

भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे पहिल्या अधिकृत निवासस्थानाला लवकरच नवा मालक मिळणार आहे. दिल्लीच्या ल्युटीयन्स झोनमधील (Lutyens’ Zone) मोतीलाल नेहरु मार्गावरील या बंगल्याचा सौदा तब्बल 1,100 कोटी रुपयांना होणार आहे. बंगल्याच्या सध्याच्या मालकांनी आधी याची किंमत 1,400 कोटी रुपये ठेवली होती. अखेर 1,100 कोटींवर सौदा निश्चित झाला आहे. ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी निवासी प्रॉपर्टी डील मानली जात आहे.

कोण आहेत सध्याचे मालक ?

या प्रॉपर्टीचे सध्याचे मालकात राजकुमारी कक्कर आणि बीना राणी यांचा समावेश आहे.दोन्ही राजस्थानच्या एका माजी राजघराण्याशी संबंधित आहेत.

नवा मालक कोण होणार ?

ETच्या बातमीनुसार या ऐतिहासिक प्रॉपर्टीला एक उद्योगपती खरेदी करीत असून त्यांचा भारतीय पेय उद्योगात मोठा दबदबा आहे.

कायदेशीर प्रक्रिया अंतिम टप्पात –

एक प्रमुख लॉ फर्मच्या हवाल्याने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की प्रॉपर्टीच्या सौद्यांसंदर्भात पब्लिक नोटीस जारी केलेली आहे. यात म्हटले आहे की खरेदीदार प्रॉपर्टीच्या टायटलची तपासणी करीत आहेत. कोणाला काही हरकती असतील तर सात दिवसात त्यांनी कळवावे असे या नोटिसीत म्हटली आहे.

3.7 एकरावर प्लॉट

लुटीयन्स झोन येथील ज्या प्लॉटवर हा बंगला आहे त्याचा आकार जवळपास 3.7 एकर आहे. म्हणजेच 14,973.38 चौरस मीटरवर हा बंगला पसरलेला आहे. यात 24,000 चौरस फूटावर हा बंगला बनलेला आहे. याचे लोकेशन दिल्लीच्या उच्चभ्रू परिसरात आहे. या लुटीयन्स झोनला 1912 ते 1930 दरम्यान ब्रिटीश आर्किटेक्ट एडविन लुटीयन्सने डिझाईन केले आहे.

लुटियन्स झोनचे महत्व

लुटियन्स झोन हा 28 चौरस किमीवर पसरलेला आहे. येथे सुमारे 3,000 बंगले आहेत.यात बहुतांशी मंत्री, जजेस आणि वरिष्ठ अधिकारी रहातात.तर 600 बंगले खाजगी मालकीचे आहेत आणि देशातील सर्वात श्रीमंत उद्योजकांच्या ताब्यात आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी लुटियन्स झोनच्या प्रतिष्ठीत गोल्फ लिंक सेक्टरमधील बंगला खरेदी केला आहे. याच प्रकारे Jindal Steel and Power चे चेअरमन नवीन जिंदाल यांचाही येथे बंगला आहे. तसेच ArcelorMittal चे चेअरमन लक्ष्मी मित्तल यांनीही 2005 मध्ये येथे एक बंगला विकत घेतला होता.