महिलेला मिळालं पार्सल, उघडताच प्रचंड घाबरली, अख्ख्या कॉलनीला फुटला घाम, पोलिसही हादरले

एक धक्कादायक घटना समोर आली आहे, एका अज्ञात व्यक्तीने महिलेला दिलेल्या पार्सलमुळे प्रचंड गोंधळ उडाला आहे, ही महिला देखील चांगलीच घाबरली, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

महिलेला मिळालं पार्सल, उघडताच प्रचंड घाबरली, अख्ख्या कॉलनीला फुटला घाम, पोलिसही हादरले
भेटवस्तू
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 02, 2026 | 8:34 PM

एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे, अचानक एका महिलेच्या घरी एक पार्सल आलं, हे पार्सल पाहून ही महिला प्रचंड घाबरली, या पार्सलमुळे चांगलाच गोंधळ उडाला. या पार्सलमुळे कॉलीमध्ये देखील दहशतीचं वातावरण निर्माण झालं, शेवटी या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, पार्सलमध्ये आलेली वस्तू पहाताच पोलिसांनाही धक्का बसला, या प्रकरणात घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की ही घटना इंदौरमध्ये घडली आहे. इंदौरच्या द्वारकापुरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका कॉलनीमध्ये घडली आहे.

पोलीस अधिकारी आनंद कलंदगी यांनी दिलेल्या माहितीनुसार एका महिलेनं या प्रकरणात त्यांच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपल्या तक्रारीमध्ये या महिलेनं म्हटलं की, माझ्या घरी एक व्यक्ती आला आणि तो माझ्या हातात एक पार्सल देऊन तिथून निघून गेला, जेव्हा मी हे पार्सल उघडलं तेव्हा मला प्रचंड धक्का बसला, मी घाबरले कारण त्या पार्सलमध्ये एक बंदुक होती. दरम्यान या घटनेसंदर्भात तक्रार प्राप्त होताच आता पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. या पार्सलसोबत एक पत्र देखील असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पार्सल पहाताच या महिलेला प्रचंड धक्का बसला, या महिलेनं या पार्सलची माहिती सर्वात आधी आपल्या शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांना दिली, त्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार या महिलेनं या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी ही बंदुक आपल्या ताब्यात घेतली आहे. या प्रकराचा तपास सुरू झाला असून, पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करण्यात आली आहे, या व्यक्तीने या महिलेला पार्सलमध्ये ही बंदुक का दिली, याच कोणतंही कारण समोर आलेलं नाही, मात्र यामागे एखादा जुना वाद असू शकतो किंवा कुणीतरी घाबरवण्याच्या उद्देशानं हे कृत्य केलं असावं असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.