AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अलर्ट! औषधांची गुणवत्ता कशी तपासली जाते, पॅरासिटामॉलसह अनेक औषधी गुणवत्ता चाचणीत फेल

medicine fail in test: CDSCO कडून ऑगस्ट 2024 मध्ये दिलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. अहवालानुसार, या औषधांना NSQ म्हणजे गुणवत्तेच्या मानकांना अनुरूप नाही असे जाहीर केले आहे. एकूण ५३ औषधी चाचणीत अपयशी ठरल्या आहेत

अलर्ट! औषधांची गुणवत्ता कशी तपासली जाते, पॅरासिटामॉलसह अनेक औषधी गुणवत्ता चाचणीत फेल
medicine fail in test
| Updated on: Sep 26, 2024 | 3:55 PM
Share

सध्या घराघरात मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे आजार आहेत. त्यामुळे प्रत्येक घरातील रुग्णांकडे या औषधी असतात. आता देशाच्या भारताच्या सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (CDSCO) विविध औषधांसंदर्भात धक्कादायक अहवाल दिला आहे. यामध्ये अनेक औषधी गुणवत्ता चाचणीत फेल ठरल्या आहेत. त्यात मधुमेह, ब्लडप्रेशन, विविध जीवनसत्त्वे, कॅल्शियम D3 सप्लिमेंट्स, मुलांमध्ये बॅक्टेरियाचा संसर्ग, ऍसिड रिफ्लक्स आणि पोटातील संसर्गासाठी लागणाऱ्या औषधी आहेत. गुणवत्तेच्या चाचण्यांमध्ये या औषधी अयशस्वी ठरल्या आहेत. CDSCO कडून ऑगस्ट 2024 मध्ये दिलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. अहवालानुसार, या औषधांना NSQ म्हणजे गुणवत्तेच्या मानकांना अनुरूप नाही असे जाहीर केले आहे. एकूण ५३ औषधी चाचणीत अपयशी ठरल्या आहेत.

औषधांचा दर्जा जाणून घेण्यासाठी औषध प्राधिकरण गुणवत्ता चाचणी घेते. औषधाची सुरक्षितता आणि त्याचा परिणाम चाचणीद्वारे समजला जातो. यासाठी सीडीएससीओच्या तज्ज्ञांची टीम अनेक प्रकारच्या चाचण्या घेते. प्रथम व्हिज्युअल तपासणी आहे. याद्वारे औषधांशी संबंधित कागदपत्रे, एक्सपायरी आणि लेबलिंग तपासले जाते.

कोणत्या औषधी गुणवत्ता चाचणीत अपयशी

  • पॅरासिटामॉल (500 मिग्रॅम): सौम्य ताप आणि वेदनाशामक म्हणून पॅरासिटामॉल या औषधाचा वापर केला जातो. सामान्यतः प्रत्येक घरात या औषधी आढळतात.
  • ग्लिमेपिराइड: मधुमेहासाठी वापरण्यात येणारे हे औषध आहे. मधुमेह म्हणजे शुगर असणारे रुग्ण नियमित ग्लिमेपिराइड वापरतात. हे अल्केम हेल्थने तयार केले होते.
  • Telma H (Telmisartan 40 mg): ग्लेनमार्कचे हे औषध उच्च रक्तदाब म्हणजे ब्लडप्रेशरच्या उपचारासाठी दिले जाते. हे औषध चाचणीत गुणवत्ता पार करु शकले नाही.
  • पॅन डी: अ‍ॅसिडीसाठी हे औषध वापरले जाते. हे औषध देखील गुणवत्तेच्या चाचणीत अपयशी ठरले. हे अल्केम हेल्थ सायन्सने केले आहे.
  • Shelcal C आणि D3 कॅल्शियम पूरक: Pure & Cure Healthcare द्वारे उत्पादित आणि Torrent Pharmaceuticals द्वारे वितरीत केलेले Shelcal, चाचणीमध्ये मानकांची पूर्तता करत नाहीत.
  • Clavam 625: हे एक प्रतिजैविक औषध आहे.
  • Sepodem XP 50 Dry Suspension: लहान मुलांमध्ये निर्माण होणाऱ्या बॅक्टीरियावर उपचार म्हणून या औषधाचा वापर केला जातो. हैदराबादमधील हेटेरो कंपनीने हे औषध बनवले आहे. ते गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरले.
  • Pulmosil (इरेक्टाइल डिसफंक्शनसाठी): सन फार्माद्वारे बनवलेले हे औषध इरेक्टाइल डिसफंक्शन म्हणून वापरले जाते.
  • पॅन्टोसिड (ऍसिड रिफ्लक्ससाठी): ऍसिडिटी आणि रिफ्लक्सच्या उपचारांसाठी वापरले जाणारे सन फार्माचे हे औषध देखील गुणवत्ता चाचणीत अयशस्वी ठरले.
  • Ursocol 300: सन फार्माचे हे औषधही गुणवत्तेचे निकष पूर्ण करत नाही.
  • Defcort 6: संधिवात उपचारात दिले जाणारे मॅक्लिओड्स फार्माचे हे औषध गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरले.
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.