AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dombivli News : भटक्या कुत्र्याने तोडला खांद्याचा लचका, 5 वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, उपचार सुरू असतानाच…

दिवा येथे भटक्या कुत्र्याच्या चाव्याने एका ५ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. महिनाभर उपचार आणि चार इंजेक्शन दिल्यानंतरही तिची प्रकृती बिघडली. यामुळे उपचार पद्धतीवर आणि महापालिकेच्या डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवर नातेवाईकांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांत संताप असून, या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी होत आहे.

Dombivli News : भटक्या कुत्र्याने तोडला खांद्याचा लचका, 5 वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, उपचार सुरू असतानाच...
भटक्या कुत्र्यांची दिव्यात दहशतImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Dec 23, 2025 | 10:54 AM
Share

मुंबईसह अनेक शहरांतील रस्त्यांवर विविध ठिकाणी भटकी कुत्री फिरताना दिसतात. काही वेळा ती रस्त्यावर नुसती बसलेली असतात, पण बहुतांश वेळा या कु्त्र्यांमुळे खूप तार्स होतो, त्याचा उपद्व वाढतो. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या अंगावर जाणं, बाईकच्या मागे भुंकत पळणे, लहान मुलांना चावणे अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यातच आता दिव्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दिव्यातील दिवा–आगासन रोड बेडेकर नगर मध्ये एका 5 वर्षांच्या चिमुकलीला कुत्रा चावला आणि तिचा मृत्यू झाला.

पिसाळलेला कुत्रा चावल्याने दिव्यात राहणारी ही 5 वर्षांची निरागस मुलगी गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र महिन्याभराच्या उपचारांनंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. चौथे इंडेक्शन दिल्यावर तर तिची तब्येत आणखी बिघडली आणि तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या कामावर नातेवाईकांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे.

भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक संतप्त , चिमुकलीचा गेला जीव

मिळालेल्या माहितीनुसार, दिवा आगासन येथे ही 5 वर्षांची चिमुकली पालकांसोबत रहायची. 17 नोव्हेंबर रोजी ती रात्री घराच्या बाहेर खेळत होती. मात्र तेवढ्यात तेथील एका पिसाळलेला कुत्रा तिच्यावर धावून आला आणि त्याने तिला चावत खांद्याचा लचकाच तोडला. मुलीचा आरडाओरडा ऐकून पालक धावत आले, तर त्यांना लेक गंभीर जखमी झालेली दिसली, कुत्र्याला कसंबस हाकलून दिलं. त्यानंतर तिच्या पालकांनी तिला डोंबिवलीमधील शास्त्री रुग्णालयात दाखल केलं, तिथे तिच्यावर उपचार करण्यात आले.

जवळपाास महिनाभर तिच्यावर उपचार सुरू होते. तिथे तिला 4 इंजेक्शन्स देण्यात आली. मात्र त्यानंतर तिची प्रकती आणखीनच खालावली. उपचारांदरम्यानच 3 डिसेंबरला तिचा वाढदिवसही झाला, तेव्हा तिची प्रकृती जरा स्थिर होती. त्यानंतर 16 डिसेंबरला उपचारांचा शेवटचा टप्पा सुरू होता, तेव्हा तिला चौथं इंजेक्शन देण्यात आल्यावर तिची तब्येत अचानक बिघडली. त्यातच तिचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे.

कुत्रा चावल्यानंतर इंजेक्शन दिल्यानंतर मुलीचा मृत्यू झाल्याने उपचार पद्धती, औषधांचा दर्जा व वैद्यकीय निरीक्षणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याप्रकरणी महापालिका व सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर टीका करण्यात आली असून या मृत्यूप्रकरणाची सखोल, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?