AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोपट मेला… तो थेट मेलेला पोपट घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातच गेला… पुढे काय घडलं?

तुमच्या भोवती अनेक प्राणीप्रेमी असतील... पण एक व्यक्तीतर पोपटाच्या मृत्यूनंतर थेट जिल्हाधिकारी कार्यालयातच पोहोचला... तेव्हा नक्की काय झालं आणि व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालयात का पोहोचला याबद्दल जाणून घ्या...

पोपट मेला... तो थेट मेलेला पोपट घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातच गेला... पुढे काय घडलं?
| Updated on: Dec 31, 2025 | 1:48 PM
Share

आपण अनेक जण असे पाहतो ज्यांचं प्राण्यांवर प्रचंड प्रेम असतं… प्राण्यांसाठी अशा व्यक्त खूप काही करत देखील असतात. पण एक व्यक्तीचर पोपटाच्या मृत्यूनंतर थेट जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला… अशात त्याने असं का केलं असेल.. अशा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल… तर जाणून घ्या नेमकं काय आणि कसं घडलंय. मंगळवारी मध्य प्रदेशातील आगर जिल्ह्यात झालेल्या सार्वजनिक सुनावणीदरम्यान, एक तक्रारदार पोपटाचा मृतदेह घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटलं. या दृश्याने केवळ प्रशासकीय कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर तिथे उपस्थित असलेल्या सामान्य जनतेलाही धक्का बसला. तक्रारदाराने चिनी मांजाची भीती आहे… असं सांगण्यासाठी पोपटाचा मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात नेला.

या व्यक्तीचं नाव विश्वकर्मा असं आहे… त्याने सांगितल्यानुसार, चिनी मांझामध्ये एक पोपट अडकला आणि त्याचे पंख गंभीरपणे कापले होते. जखमी अवस्थेत पोपट त्यांच्या गच्चीत पडला. विश्वकर्मा कुटुंबियांनी पूर्ण रात्र पोपटाची काळजी घेतली. पण वाचवण्याचा देखील प्रयत्न केला. पण गंभीर दखमी असल्यामुळे त्याचं निधन झालं.

त्यानंतर, धर्मेंद्र विश्वकर्मा मृत पोपटाच्या मृतदेहासह थेट जनसुनावणीला पोहोचला आणि अधिकाऱ्यांसमोर आपली व्यथा मांडली. त्याने सांगितले की, राज्यात चिनी मांजावर बंदी असूनही, त्याची खुली खरेदी, विक्री आणि वापर सुरूच आहे. याचे परिणाम फक्त पक्ष्यांना नाही तर, सामान्य जनतेला देखील भोगावे लागत आहेत…

तक्रारदाराने प्रशासनाकडे मागणी केली की, चिनी मांजाविरुद्ध केवळ कागदोपत्री कारवाई करू नका, तर प्रत्येक्षात कठोर आणि प्रभावी पावले उचलली पाहिजेत. पक्षी या मांज्यामध्ये अडकून आपले प्राण गमावत आहे… यापूर्वी अनेक व्यक्ती देखील मांज्यामुळे जखमी झाल्या आहेत.

यामुळे हे स्पष्ट आहे की हा मांजा जीवघेणा ठरत आहे. सार्वजनिक सुनावणीला उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी तक्रार गांभीर्याने ऐकली आणि योग्य कारवाईचे आश्वासन दिल्याची माहिती समोर येत आहे.

मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप.
मुंबईत उत्तर भारतीय महापौर! BJPच्या बड्या नेत्यानं ठाकरे बंधूंना डिवचल
मुंबईत उत्तर भारतीय महापौर! BJPच्या बड्या नेत्यानं ठाकरे बंधूंना डिवचल.
अर्ज दाखल लढती फिक्स.. 11 ठिकाणी युती.. तर 18 महापालिकेत आमने-सामने
अर्ज दाखल लढती फिक्स.. 11 ठिकाणी युती.. तर 18 महापालिकेत आमने-सामने.
ठाकरेंनी समर्थकाला डावललं अन् फायर आजी थेट 'मातोश्री'वर
ठाकरेंनी समर्थकाला डावललं अन् फायर आजी थेट 'मातोश्री'वर.
कुठं रडारड तर कुठं हमरी-तुमरी...तिकीट का नाकारलं? इच्छुकांचा राडा अन..
कुठं रडारड तर कुठं हमरी-तुमरी...तिकीट का नाकारलं? इच्छुकांचा राडा अन...
महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा
महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा.
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट.