अयोध्येत प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाआधी रंगणार पतंग महोत्सव, करण्यात आलंय भव्य आयोजन

Ayodhya Ram mandir update : अयोध्येत २२ जून रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. भव्य राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर २५ जानेवारीनंतर इतर भाविकांना दर्शन घेता येणार आहे. राम मंदिराच्या भव्य कार्यक्रमासाठी देश सज्ज झालाय. अनेक ठिकाणी उत्साहाच वातावरण आहे.

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाआधी रंगणार पतंग महोत्सव, करण्यात आलंय भव्य आयोजन
| Updated on: Jan 04, 2024 | 6:14 PM

Ram mandir Update : देशात सगळीकडे राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचा उत्साह दिसत आहे. अतिशय भव्य असं हे राम मंदिर बांधण्याचं काम अंंतिम टप्प्यात आहे. २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पण या राम मंदिराची वैशिष्ट्ये काय आहेत याची माहिती रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिली आहे.

राम मंदिर हे तीन मजली असून मुख्य गर्भगृहात श्री राम लालाची मूर्ती असणार आहे. पहिल्या मजल्यावर दरबार असेल. मंदिरात एकूण पाच हॉल आहेत. मंदिराचे खांब आणि भिंतींवर देवदेवतांची शिल्पे आहेत. सिंहद्वार येथून भाविक मंदिरात प्रवेश करु शकणार आहेत. अपंगासाठी देखील खास व्यवस्था करण्यात आली आहे.

अयोध्येत रामाचे भव्य मंदिर तयार होत आहे. प्राणप्रतिष्ठेच्या या कार्यक्रमाला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत. अयोध्येत आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाची रूपरेषाही तयार केली जात आहे. मुख्यमंत्री योगींच्या इराद्यानुसार अयोध्या विकास प्राधिकरणाने (ADA) अयोध्येत आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव आयोजित करण्याची तयारी सुरू केली आहे.

19 ते 21 जानेवारी दरम्यान आयोजन

19 ते 21 जानेवारी दरम्यान हे आयोजन केले जाऊ शकते आणि देशातील आणि जगातील प्रसिद्ध पतंग उडवणाऱ्यांना त्यांची कला दाखवण्याची संधी मिळेल. या संपूर्ण प्रक्रियेला ठोस स्वरूप देण्यासाठी अयोध्या विकास प्राधिकरणाशी (एडीए) खासगी एजन्सी जोडली जाईल.

कार्यक्रमातील विशेष निमंत्रितांना राहण्यासाठी एक विश्रामगृह बांधण्यात येणार आहे. यासोबतच येथे होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान माकडांपासून तंबू आणि उपकरणे सुरक्षित ठेवण्यासाठी खबरदारीची व्यवस्था करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी विविध प्रकारचे उच्च दर्जाचे कॅमेरा सेटअप आणि साउंड सेटअपही बसवण्यात येणार आहेत. मकरसंक्रांतीच्या दिवशी अयोध्येसह देशाच्या विविध भागात पतंगबाजी होत असते, अशा परिस्थितीत हा कार्यक्रम केवळ अयोध्येतच नव्हे तर देश-विदेशात चर्चेच्या केंद्रस्थानी असेल.