
Patanjali : आजकालच्या धकाधकीच्या जीवनामुळे लोकांची जीवनशैली बदलली आहे. याच बदललेल्या जीवनशैलीमुळे लोकांना अनेक आजारांना तोंड द्यावं लागतंय. याच जीवनशैलीमुळे अनेकांना यकृतासंबंधीच्या अडचणींना सामोरे जावे लागते. फॅटी लिव्हर हा देखील आजार तोंड वर काढताना दिसतोय. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पतंजलीने फॅटी लिव्हर या आजाराबाबत अनेक दर्जेदार आणि चांगले परिणाम देणारी औषधं आणली आहेत.
फॅटी लिव्हरमुळे लिव्हर सोरायसिसची समस्या निर्माण होते. पण यकृतासंबंधीच्या आजारांना दूर करण्यासाठी आयुर्वेदिक औषधं रामबाण उपाय ठरू शकतात. यात पतंजलीच्या काही औषधांचा समावेश आहे.
बदललेली जीवनशैली यामुळे फॅटी लिव्हरची समस्या निर्माण होते. निकृष्ट दर्जाचे आणि चुकीच्या अन्नाचे सेवन केल्यामुळेही फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. अशा समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून नियमितपणे व्यायाम करणे गरजेचे आहे. तुम्हाला फॅटी लिव्हरची समस्या असले तर त्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता. या उपायांत आयुर्वेदिक औषधांचाही समावेश आहे. आवश्यकतेनुसार आयुर्वेदिक औषधं घेतली तर शरीराला अपाय होत नाही. यकृताचे आरोग्य जपण्यासाठी पतंजनलीने अनेक औषधं बाजारात आणली आहेत. या औषधांचे सेवन केल्यास यकृतीचे आरोग्य कायम राहते.
हरिद्वार येथे असलेल्या पतंजली संशोधन केंद्रात यकृताचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनातून काही बाबी समोर आल्या आहेत. लिव्ह अमृत टॅबलेट्, दिव्या कासीम भस्म, बेल मुरब्बा ही औषधं यकृताच्या आरोग्यासाठी फार उत्तम आहेत.
तसेच यकृताच्या आरोग्यासाठी अलावादिव्य गोधन, अर्क, दिव्य पुनर्नवारिष्ट ही औषधंदेखील घेता येतील, असं पतंजली संशोधन केंद्राच्या अभ्यासातून समोर आले आहे. फॅटी लिव्हरसाठी दिव्य लिव्ह अमृत टॅब्लेटही फार गुणकारी आहे. याशिवाय यकृताला तंदुरुस्त ठेवण्यासाठी दुधी भोपळा, जांभूळ हेदेखील फार उपयोगी ठरतात.