तुम्हाला शक्य नाही आम्ही चीनकडे मदत मागणार, भारताला जे नको तेच घडतंय, थेट मणिपूरच्या सीमा..
मणिपूरच्या संवेदनशील भारत-म्यांमार सीमा क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित केला. नागा छात्र आणि नागरिक संघटन केंद्र आणि राज्य सरकारला मोठा इशारा दिला. थेट आम्ही चीनची मदत घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

मणिपूरच्या संवेदनशील भारत-म्यांमार सीमा क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित केला. नागा छात्र आणि नागरिक संघटन केंद्र आणि राज्य सरकारला मोठा इशारा दिला. संघटनेने म्हटले की, सरकार स्थानिक आदिवासी नागरिकांची सुरक्षा करू शकत नाही तर शेजारी देश चीनची मदत लोकांना मागावी लागेल, त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसेल. हा संवेदनशील भाग आहे. तिथे लोकांच्या सुरक्षेचा मोठा गंभीर प्रश्न आहे. सुरक्षेसाठी पाऊले उचलणे आवश्यक आहे. यारचुइसो कांशुग यांनी म्हटले की, जर मणिपूर सरकार आणि भारत सरकार आदिवासी नागरिक खास करून संवेदनशील सीमा भागात राहणाऱ्या लोकांची सुरक्षा करण्यास सक्षम नसेल तर शेजारी देशाची मदत घेतल्याशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही.
आम्ही थकलो आहोत आणि नागा नागरिकांच्या सुरक्षेसाठी तात्काळ पाऊले उचलणे आवश्यक आहे. नागा नागरिकांच्या सुरक्षेच्या मुद्द्यात काशुंग यांनी माणिपूरच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्री राज्य आणि लोकांच्या सुरक्षेसाठी सक्षम नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा. सीमा भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मनस्थितीवर त्यांनी भाष्य केले.
राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सीमा क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांचा विचार करत नाहीत. मणिपूरचा भाग केंद्र सरकारचा भाग नाही की भारताचा भाग नाही? असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला. काशुंग यांनी यादरम्यान सेनापती आणि लोकांवर होणाऱ्या त्रासाबद्दलही मोठे विधान केले. आता पुन्हा एकदा मणिपूरचा विषय पेटल्याचे बघायला मिळतंय. आता तर जर सीमा भागातील नागरिकांच्या प्रश्नांकडे सरकारने लक्ष दिले नाही तर आम्ही थेट चीनची मदत घेणार असल्याचे जाहीर केले.
आता मणिपूरचा मुद्दा भारत सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यातच थेट चीनची मदत घेणार असल्याचा एकप्रकारचा इशारा देण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये मोठा तणाव बघायला मिळत आहे. त्यातच हा इशारा देण्यात आला. थेट चीनकडे मदत मागितली जाऊ शकते. आता यावर भारत सरकार नक्की काय निर्णय घेते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
