AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price Today: पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी घसरण? वाचा आजचा नवा दर

Petrol Diesel Price Today: गेल्या काही दिवसांपासून आंतराष्ट्रीय बाजारात घडत असलेल्या घडामोडींमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत बदल होत आहेत. आजचा पेट्रोल आणि डिझेलचा दर काय आहे? वाचा...

Petrol Diesel Price Today: पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी घसरण? वाचा आजचा नवा दर
petrol-dieselImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 19, 2026 | 8:46 AM
Share

कच्च्या तेलाच्या किंमतीत आज पुन्हा घसरण दिसून येत आहे. क्रूड ऑईल १०० डॉलर प्रति बॅरलच्या जवळ पोहोचले आहे. तर ब्रेंट क्रूड फ्यूचर्सचा दरही १ टक्क्याने घसरला आहे. त्यानंतर किंमती १०३ डॉलर प्रति बॅरलच्या आसपास ट्रेड होत आहेत. मात्र, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आज शनिवार, १९ सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांकडून कोणताही बदल झालेला नाही. किंमती जुन्या स्तरावरच आहेत. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि एचपी यांच्याकडून नवीन किंमती सकाळी ६ वाजता जाहीर करण्यात आल्या आहेत. तेल मार्केटिंग कंपन्यांकडून शेवटचे पेट्रोल आणि डिझेलचे दर मे महिन्यात वाढवण्यात आले होते. त्यानंतरपासून दर स्थिर आहेत.

देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोलचा दर काय आहे? (पेट्रोल किंमत आज)

नवी दिल्ली – १०२.११२ रुपये

कोलकाता – ११३.५१ रुपये

मुंबई – १११.२१ रुपये

चेन्नई – १०७.७६ रुपये

गुरुग्राम – १०२.९७ रुपये

नोएडा – १०१.७७ रुपये

बंगळुरू – ११०.९७ रुपये

भुवनेश्वर – १०८.९७ रुपये

चंदीगड – १०२.२० रुपये

हैदराबाद – ११५.७३ रुपये

लखनौ – १०१.८६ रुपये

पटना – ११३.८१ रुपये

तिरुअनंतपुरम – ११५.४९ रुपये

४ वर्षांनंतर वाढवण्यात आले होते पेट्रोल आणि डिझेलचे दर

यावर्षी मे महिन्यात ४ वर्षांनंतर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले होते. तेल मार्केटिंग कंपन्यांकडून पहिल्यांदा १५ मे रोजी किंमतीत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आणखी तीन वेळा दर वाढवण्यात आले. त्यामुळे देशांतर्गत पातळीवर पेट्रोल आणि डिझेलचा दर ७.५ रुपये प्रति लिटरपर्यंत महाग झाला होता. शेवटचे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत २०२२ मध्ये वाढ करण्यात आली होती.

डिझेलचा आजचा दर काय आहे? (डिझेल किंमत आज)

नवी दिल्ली – ९५.२० रुपये

कोलकाता – ९९.८२ रुपये

मुंबई – ९७.८३ रुपये

चेन्नई – ९९.५५ रुपये

गुरुग्राम – ९५.६४ रुपये

नोएडा – ९५.२६ रुपये

भुवनेश्वर – १००.६८ रुपये

चंदीगड – ८९.४७ रुपये

हैदराबाद – १०३.८६ रुपये

जयपूर – ९८.५० रुपये

लखनौ – ९५.३६ रुपये

पटना – ९९.८० रुपये

तिरुअनंतपुरम – १०४.४१ रुपये

तेल कंपन्यांचा खर्च वाढला

मधल्या काळात जेव्हा कच्च्या तेलाचा दर पुन्हा ११० डॉलरच्या जवळ पोहोचला होता, तेव्हा तेल कंपन्यांना पुन्हा जास्त तोटा होऊ लागला होता. रिपोर्ट्सनुसार पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर २३ रुपये प्रति लिटरचा तोटा सहन करावा लागला होता. आता पाहायचे आहे की सणासुदीच्या या हंगामात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढतील की नाही.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं