AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price Today: क्रूड ऑइलचे दर घसरले, आज पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले? वाचा दर

Petrol Diesel Price Today: फेब्रुवारीमध्ये युद्ध सुरू होण्यापूर्वी कच्च्या तेलाचा रेट ७० डॉलर प्रति बॅरलच्या आसपास होते. आता हे दर सतत वाढत आहेत. त्याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर होताना दिसत आहे.

Petrol Diesel Price Today: क्रूड ऑइलचे दर घसरले, आज पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले? वाचा दर
Petrol Diesel Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 26, 2026 | 9:58 AM
Share

ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून सकाळी ६ वाजता नवीन रेट्स जाहीर करण्यात आले आहेत. दिलासा देणारी बाब म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये या आठवड्यात घसरण दिसून आली आहे. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात १०० डॉलर प्रति बॅरलच्या पार गेलेला क्रूड ऑइलचा रेट घसरून आता ९२ डॉलर प्रति बॅरलच्या जवळ आहे. मात्र तरीही तो अजूनही खूप जास्त आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये आज शनिवारी पुन्हा एकदा तेल कंपन्यांकडून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. फेब्रुवारीमध्ये युद्ध सुरू होण्यापूर्वी कच्च्या तेलाचा रेट ७० डॉलर प्रति बॅरलच्या आसपास होता.

कच्च्या तेलाच्या उच्च किमती असूनही ऑइल मार्केटिंग कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे रेट वाढवत नाहीत. यामागे सणासुदीचा हंगामही कारणीभूत असू शकतो. काही दिवसांपूर्वीच एक अहवाल समोर आला होता, ज्यात पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर २३ रुपये नुकसान होत असल्याचे सांगण्यात आले होते.

दिल्लीपासून लखनऊपर्यंत पेट्रोलचा रेट काय आहे? (Petrol price today)

दिल्लीत – १०२.१२ रुपये

कोलकाता – ११३.५१ रुपये

मुंबई – १११.२१ रुपये

चेन्नई – १०७.७६ रुपये

गुरुग्राम – १०२.९७ रुपये

नोएडा – १०१.७७ रुपये

बंगळुरू – ११०.९७ रुपये

भुवनेश्वर – १०८.९७ रुपये

चंदीगड – १०२.२० रुपये

हैदराबाद – ११५.७३ रुपये

लखनऊ – ११३.८१ रुपये

तिरुअनंतपुरम – ११५.४९ रुपये

डिझेलचा रेट किती आहे? (Diesel price today)

नवी दिल्ली – ९५.२० रुपये

कोलकाता – ९९.८२ रुपये

मुंबई – ९७.८३ रुपये

चेन्नई – ९९.५५ रुपये

गुरुग्राम – ९५.६४ रुपये

नोएडा – ९५.२६ रुपये

भुवनेश्वर – १००.६८ रुपये

चंदीगड – ८९.४७ रुपये

हैदराबाद – १०३.८६ रुपये

जयपूर – ९८.५० रुपये

पटना – ९९.८० रुपये

तिरुअनंतपुरम – १०४.४१ रुपये

४ महिन्यांपूर्वी वाढला होता तेलाचा दर

शेवटचे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये मे महिन्यात वाढ झाली होती. त्यानंतर रेटमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मे महिन्यात एकामागून एक चार वेळा वाढ झाली होती. त्यामुळे देशांतर्गत पातळीवर किमतींमध्ये ७.५ रुपये प्रति लिटरपर्यंत वाढ झाली होती. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी यापूर्वी २०२२ मध्ये पेट्रोल आणि डिझेलचे रेट वाढवले होते.

Follow Us
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan LIVE: राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर...
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
Mumbai Ganpati Visarjan | गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू; आणखी विलंब होण्याची...
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू... आणखी विलंब होण्याची शक्यता, नेमकं कारण समोर
गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
आजच्या मोहिमेत जवळपास 3 हजार... गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना..
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना आणखी उशिर
मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
Lalbag Cha Raja : मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर