AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Prices : सर्वसामान्यांना मिळणार मोठा दिलासा, पेट्रोल-डिझेल इतक्या रुपयांनी होणार स्वस्त

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून इंधनावरील कर कमी करण्याचे नियोजन सुरु आहे. ज्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होणार आहे.

Petrol Diesel Prices : सर्वसामान्यांना मिळणार मोठा दिलासा, पेट्रोल-डिझेल इतक्या रुपयांनी होणार स्वस्त
| Updated on: Feb 16, 2023 | 2:15 PM
Share

Petrol Diesel Prices : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Prices) घट होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली की याचा परिणाम सर्वसामान्यांच्या उत्पन्नावर देखील होत असतो. यामुळे भाजीपाला पासून अनेक वस्तूंचे दर देखील वाढतात. महागाईमुळे अनेकांचं बजेट कोलमडतं. पण सरकारकडून लवकरच एक मोठा दिलासा देण्याची तयारी सुरु आहे. केंद्र सरकार टॅक्स (Tax) कमी करण्याचा विचार करत आहे. ज्याचा सरळ परिणाम महागाई नियंत्रणात आणण्यात देखील होऊ शकतो. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात याबाबत निर्णय होऊ शकतो.

IIFL चे अनुज गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार 7 ते 10 रुपयांपर्यंत एक्साइज ड्यूटी (Tax on Fuel) कमी करु शकते. यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात 5 ते 7 रुपये कमी होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मे 2022 मध्ये पेट्रोलवर 8 रुपये तर डिझेलवर 6 रुपये प्रति लीटरने एक्साईज ड्यूटी कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे देशात पेट्रोलचे दर लीटरमागे 9.5 रुपयांनी तर डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी झाले होते.

भारत आपल्या गरजेच्या दोन तृतीयांश तेलाची आयात करतो. केंद्र सरकारच्या कर कपातीमुळे किरकोळ ग्राहकांसाठी किमती कमी करण्यासाठी पंपचालकांवर दबाव येईल. त्यामुळे महागाई कमी होण्यास मदत होईल.

देशात सध्या महागाईचा दर 6.52 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून महागाई नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. एप्रिलमध्ये पुन्हा रेपो रेटमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. महागाई दर वाढत असल्याने आरबीआयच्या (RBI) सल्लानुसार केंद्र सरकारकडून रेपो रेट वाढवला जाण्याची शक्यता आहे.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गेल्या काही महिन्यांत घसरल्या आहेत आणि आता स्थिर आहेत. पण असं असलं तरी देखील याचा फायदा अद्याप इंधन कंपन्यांनी ग्राहकांना दिला नाही. ते जुने नुकसान भरून काढत आहेत.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.