
बिहार विधानसभा निवडणुकीतील शानदार विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारच्या मतदारांचे आणि सहयोगी पक्षांचे आभार मानले. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात विरोधकांवर सडकून टीका केली. खासकरून काँग्रेसवर निशाणा साधला. यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेसला नवीन नाव दिले आहे. काँग्रेस म्हणजे मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, आज एका विधानसभेत आम्हाला जेवढ्या जागा मिळाल्या तेवढ्या जागा काँग्रेसला लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या निवडणुकीतही मिळाल्या नाहीत. काँग्रेसचा निवडणुकीचा आधार केवळ निगेटिव्ह झाला आहे. चौकीदार चोर म्हणायचं, कधी ईव्हीईएमवर आरोप, कधी मतचोरीचा आरोप, कधी निवडणूक आयोगाला शिव्या घालणं, देशाच्या शत्रूचे अजेंडे समोर आणणं सुरू आहे.
काँग्रेसकडे पॉझिटिव्ह व्हिजन नाहीये. आज काँग्रेस मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस म्हणजे एमएमसी झाली आहे. ही काँग्रेस मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस आहे आणि काँग्रेसचा संपूर्ण अजेंडा त्यावरच चालत आहे. त्यामुळे काँग्रेसमध्येही दुसरा गट निर्माण होत आहे. हा गट निगेटिव्ह पॉलिटिक्सच्या विरोधात आहे. जे काँग्रेसचे नेते निगेटिव्हि पॉलिटिक्स घेऊन जात आहे, त्याच्या विरोधात अंतर्गत धुसफूस सुरू आहे.
मी बिहार निवडणुकीत सांगितलं होतं की काँग्रेसचे नामदार तलावात डुबकी मारून बिहार निवडणुकीत स्वत डुबण्याची आणि इतरांना डुबवण्याची प्रॅक्टिस करत आहे. मी आधीही या मंचावरून काँग्रेसच्या साथीदारांना सावधान केलं होतं. काँग्रेस ही परजीवी आहे, ते आपल्या सहकाऱ्यांचे व्होट बँक घेऊन पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या मित्रपक्षांनी त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे.
पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले की, आज बिहारमध्ये आरजेडीला साप चावला आहे. लवकरच आरजेडी आणि कांग्रेसचा झगडा समोर येणार आहे. आजचा विजय नव्या प्रवासाची सुरुवात आहे. बिहारने जो विश्वास टाकला, त्यामुळे आमच्या खांद्यावर जबाबदारी अधिक वाढली आहे. मी तुम्हाला विश्वास देतो की येणाऱ्या पचा वर्षात बिहार अधिक वेगाने पुढे जाईल. बिहारमध्ये नवीन उद्योग येतील. बिहारच्या तरुणांना बिहारमध्येच रोजगार मिळेल यासाठी काम करू.