‘यांचा’ विषयच हार्ड आहे; विश्वगुरू म्हणतात, नोकरीसाठी पदवीची गरजच नाही…

वकांनी कौशल्य विकासाचे महत्व ओळखून त्यातही पारंगत होणं गरजेचं आहे. भविष्यात, जर विद्यार्थ्याकडे कोणतीही पदवी नसेल, परंतु काही कौशल्य असली तरी ती पुरेशी आहेत.

'यांचा' विषयच हार्ड आहे; विश्वगुरू म्हणतात, नोकरीसाठी पदवीची गरजच नाही...
Follow us
| Updated on: Oct 10, 2022 | 8:49 PM

अहमदाबादः सध्या बेरोजगारीवरुन सरकारला घेरले जात असतानाच नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) शिक्षण आणि पदवीबद्दल जाहीर वक्तव्य केल्यामुळे आता त्याच वाक्याची जोरदार चर्चा सुरू आहे. रोजगारावरुन सुरू असलेल्या वादावरुन उमेदवारांनी शिक्षित असणे गरजेचे आहे असं म्हणतात. असंही म्हटलं जातं की, ज्यांच्याकडे अभ्यास आणि चांगली पदवी (Degree) आहे. त्यांनाच चांगल्या संस्थेत आणि भरभक्कम पदावर नोकरी मिळते. एकीकडे याची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक विधान चर्चेत आले आहे.

अहमदाबादजवळ (Ahmedabad) एका शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, भविष्यात एखाद्या विद्यार्थ्याकडे पदवी नसली तरी चालतील मात्र त्यांच्याकडे काही कौशल्ये असतील तर त्यांना चांगली नोकरी मिळू शकते असंही त्यांनी स्पष्ट सांगितले.

पंतप्रधान मोदी गेल्या रविवारपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. गुजरातमधील छरोडी, अहमदाबादजवळ मोड वनिक मोदी समाजाने मोदी शैक्षणिक संकुलाची स्थापना केली आहे.

यावेळी त्यांनी सांगितले की, जो समाज शिक्षणावर लक्ष केंद्रित करतो तोच समाज यशस्वी होतो. तरुणांसाठी शिक्षण अधिक सुलभ करण्याच्या मार्गांवरही लक्ष केंद्रित करणे हा यशस्वी होण्याचा एक उत्तम मार्ग असल्याचेही त्यांनी सांगितले. आमच्या लोकांना उशीर झाला असला तरी आम्ही योग्य मार्गावर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गुजरातमध्ये बोलताना ते म्हणाले की, अधिक संख्येने तरुण वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि इतर विषयांकडे लक्ष केंद्रित करत आहेत.

मात्र युवकांनी कौशल्य विकासाचे महत्व ओळखून त्यातही पारंगत होणं गरजेचं आहे. भविष्यात, जर विद्यार्थ्याकडे कोणतीही पदवी नसेल, परंतु काही कौशल्य असली तरी ती पुरेशी आहेत.

गुजरातमधील ज्या कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदींनी हजेरी लावली त्या मंचावर त्यांचे मोठे भाऊ सोमाभाई मोदी उपस्थित होते. ते त्यांच्या समाजातील महत्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत.

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.