Operation Sindoor : PM मोदींच परिस्थितीवर बारीक लक्ष, रात्रभर ऑपरेशनची मॉनिटरिंग

Operation Sindoor : भारताने पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. रात्री 1.30 वाजता ऑपरेशन सिंदूर लॉन्च करण्यात आलं. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि POK मिळून 9 दहशतवादी तळांना टार्गेट केलय.

Operation Sindoor : PM मोदींच परिस्थितीवर बारीक लक्ष, रात्रभर ऑपरेशनची मॉनिटरिंग
PM Modi
| Updated on: May 07, 2025 | 8:19 AM

भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत रात्रभर ऑपरेशनच मॉनिटरिंग करत होते. भारताने पाकिस्तान विरोधात एअर स्ट्राइक केला आहे. पाकिस्तान आणि POK मिळून 9 दहशतवादी तळांना टार्गेट केलय. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी सकाळी 9 वाजता कॅबिनेट कमेटी ऑन सिक्योरिटीची बैठक बोलवली आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तळ बहावलपूरमध्ये होता. ऑपरेशन दरम्यान 9 तळांना लक्ष्य करण्यात आलं. यात जैश-ए-मोहम्मदच मुख्यालय आणि मुरीदकेमधील लश्कर-ए-तैयबाचा तळ होता.

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्तीगतरित्या या ऑपरेशनची मॉनिटरिंग केली. त्यांना चीफ ऑफ डिफेंस स्टाफ, वरिष्ठ गोपनीय अधिकारी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सतत माहिती दिली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पीएम मोदी सैन्य, नौदल आणि एअर फोर्स चीफ दरम्यान अनेक बैठका झाल्या.

संरक्षण मंत्रालयाने काय म्हटलं?

या हल्ल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने मध्यरात्री 1.44 मिनिटांनी एक स्टेटमेंट जारी केलं. “कुठल्याही पाकिस्तानी सैन्य प्रतिष्ठानला लक्ष्य करण्यात आलेलं नाही. दहशवादी कारवायांसाठी वापरलं जाणारं इन्फ्रास्ट्रक्चर उद्धवस्त केलं” असं संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे.

पाकिस्तान अधिकृत जम्मू-कश्मीरमध्ये

मुजफ्फराबाद

कोटली

गुलपुर

बिंबर

पाकिस्तानात चार ठिकाणी टार्गेट

सियालकोट

चक अमरू

मुरीदके

बहावलपूर

पाकिस्तानने काय म्हटलय?

भारताने ऑपरेशन सिंदूर करुन पाकिस्तानला धक्का दिला आहे. पाकिस्तानने त्यांच्या देशात भारताकडून मिसाइल स्ट्राइक झाल्याची कबुली दिली आहे. भारताने 6 ठिकाणी 24 मिसाइल डागल्याची माहिती पाकिस्तानी लष्कराने दिली आहे. यात 8 लोकांचा मृत्यू झाला असून 33 जखमी झाल्याच त्यांनी सांगितलं.