
संसदेत निवडणूक सुधारणांवर चर्चा सुरु होती. भाजपाच्या खासदार कंगना राणौत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना एक वक्तव्य केलं. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी EVM नाही, तर लोकांचं ह्दय हॅक करतात’ असं त्या म्हणाल्या. विरोधी पक्षांच्या आरोपावर उत्तर देताना कंगना राणौत हे म्हणाल्या. लोकसभेत 9 डिसेंबरला निवडणूक सुधारणांवर चर्चा सुरु झाली. काँग्रेसकडून EVM मध्ये गडबडीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. ईव्हीएमवर लोकांना संशय आहे. लोकांच्या मनातून हा संशय दूर व्हावा यासाठी आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या पाहिजेत अशी मागणी काँग्रेसने केली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक सुधारणांवर बोलताना मोदी सरकार आणि भाजपला घेरलं होतं. निवडणूक आयोगासोबत मिलीभगत असल्याचा आरोप केला होता.
आज लोकसभेत या विषायवर हिमाचल प्रदेश मंडीच्या भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांनी आपलं मत मांडलं. कंगना यांनी राहुल गांधींना टार्गेट केलच पण त्याचवेळी पीएम मोदी EVM हॅक करत नाहीत, तर लोकांच ह्दय हॅक करतात असं ती म्हणाली. “हे लोक म्हणतात की, जुन्या काळात मतदान सर्वात चांगलं होतं. त्यावेळी सुद्धा गडबड, घोटाळे व्हायचे. हे लोक बॉक्स उचलून घेऊन जायचे” असं कंगना राणौत म्हणाल्या.
म्हणून मी संसदेकडून माफी मागते
भाजप खासदार कंगना राणौतने विरोधी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. “हे लोक दररोज SIR, SIR करुन करुन गोंधळ घालतात. काल राहुल गांधी जेव्हा बोलत होते, खादीमध्ये धागा आहे, धाग्यापासून कपडा बनतो. अखेरीस ते परदेशी महिलेच्या फोटोवर आले. ती स्वत: म्हणाली की, मी कधी भारतात गेलेली नाही. तिचा फोटो प्ले कार्डवर वापरण्यात आला आहे. तिच्या पर्सनालिटी राइट्सचाही विचार केला नाही. म्हणून मी संसदेकडून माफी मागते” असं कंगना म्हणाल्या.
‘वन नेशन, वन इलेक्शन’बद्दल सुद्धा बोलल्या
कंगना म्हणाल्या की, ‘काँग्रेसच्या चरित्रात मर्यादा नाहीय’ त्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’बद्दल सुद्धा बोलल्या. त्यामुळे वारंवार निवडणुकीची असुविधा आणि आर्थिक नुकसान टाळता येईल. हा लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा करण्याचं आणि प्रस्ताव लागू करण्याचं अपील केलं.