
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोलकाता येथील रॅलीला प्रचंड गर्दी झाली. गर्दी एवढी झाली होती की कार्यक्रम स्थळ ओव्हरपॅक झाले होते. लोकांनी जागा न मिळाल्याने त्यांनी दुरदर्शनच्या ओबी व्हॅनजवळ उभे राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकले. सभेच्या जागी मुंगी शिरायलाही जागा नव्हती. त्यामुळे शेकडो लोक रस्त्यावर जागोजागी थांबून पंतप्रधान मोदी यांचे भाषण ऐकत असताना दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीएमसी नेत्या ममता बॅनर्जी सरकारवर हल्लाबोल केलात. घुसखोरीचाही उल्लेख केला आणि घुसखोरांविरोधात मोहिम सुरु करण्याचे सुतोवाच केले.
बिहारच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान आता पश्चिम बंगालची राजधानी कोलकातात पोहचले होते. येथे त्यांनी जेसोर रोड मेट्रो स्थानक ते नोआपारा-जय हिंद विमानबंदर मेट्रो सेवा, सियालदह-एस्प्लेनेड मेट्रो सेवा आणि बेलेघाटा-हेमंत मुखोपाध्याय मेट्रो सेवेला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधन केले. त्यावेळी राज्यातील सध्याच्या टीएमसीच्या ममता बॅनर्जी सरकारवर त्यांनी कठोर शब्दात हल्ला केला. यावेळी टीएमसीची सरकार जाणार आणि बीजेपी येणार अशी घोषणा मोदी यांनी यावेळी केली.
पीएम मोदी यांनी रॅलीला संबोधित करताना स्पष्ट केले की आता घुसखोरांना देशातून बाहेर जावे लागेल. आम्ही घुसखोरांविरोधात मोहीम सुरु केली आहे. घुसखोरीबद्दल आपण लाल किल्ल्यावरील भाषणात चिंता व्यक्त केली होती. ही चिंता घुसखोरीच्या वाढत्या धोक्याबद्दल आहे. कोलकाता आणि प.बंगाल नेहमीच काळाच्या पुढचा विचार करतात. त्यामुळे मी नेहमीच राष्ट्रीय आव्हानांविषयी येथे नेहमीच बोलत असतो असेही मोदी यावेळी म्हणाले.
घुसखोरांना आम्ही भारतात राहू देणार नाही. यासाठी भारताने घुसखोरांविरोधात इतकी मोठी व्यापाक मोहिम सुरु केली आहे. मला आश्चर्य वाटते की टीएमसी-काँग्रेससह अनेक राजकीय पक्ष तुष्टीकरणाच्या पुढे इतके गुडघे टेकत असून या राजकीय पार्ट्या सत्तेच्या लालसेपोठी घुसखोरीला प्रोत्साहन देत आहेत.
मोदी यांनी पुढे सांगितले की प.बंगालमध्ये टीसीएमसीची सरकार जोपर्यंत राहिल तोपर्यंत बंगालचा विकास थांबलेला असेल.त्यामुळे आज बंगालचा प्रत्येक जण सांगत आहे की टीएमसी जाईल तेव्हाच बदल होईल. हे वर्षे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जन्मतिथीचे १२५ वे वर्षे आहे. भाजपाचा जन्मच डॉ.मुखर्जी यांच्या आशीर्वादाने झाला होता.
पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी भारताच्या औद्योगिक विकासाचे जनक राहिले आहेत. दुर्भाग्य म्हणजे काँग्रेसने त्यांना याचे कधी श्रेय दिले नाही. देशाचे पहिले उद्योग मंत्री म्हणून भारताचे पहिले औद्योगिक पॉलीसी त्यांनी बनवली होती. त्यांचे धोरणात बंगालच्या या धरतीचे कौशल्य होते. येथील अनुभव होता.जर आम्ही त्या नितीवर चाललो असतो देशाचे भविष्य निश्चितच वेगळे असते.
पीएम मोदी म्हणाले की प.बंगाल लोकसंख्येच्या दृष्टीने देशाच्या सर्वात मोठ्या राज्यांपैकी एक आहे. यासाठी जोपर्यंत प.बंगालचे सामर्थ्य वाढणार नाही,तोपर्यंत विकसित भारताचा प्रवास संपणार नाही. कारण भाजप मानतेय की भाजपाची श्रद्धा आहे जेव्हा बंगालचा उदय होईल तेव्हाच विकसित भारत तयार होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की भाजपा जो संकल्प करते तो सिद्ध करुन दाखवते. याचे ताजे उदाहरण आता आम्ही ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाहिले. आपल्या सैन्या सीमेपलिकडील अतिरेकी आणि दहशतवाद्यांचे अड्डे खंडहर करुन टाकले. आपल्या सैन्याने अतिरेक्यांना असा धडा शिकवला आहे की पाकिस्तानची अजूनही झोप उडालेली आहे.
मी अशा वेळी आलो आहे ज्यावेळी बंगालमध्ये दुर्गा पूजेची तयारी सुरु आहे. कोलकाता नव्या रंगात, नव्या प्रकाशात सजत आहे. श्रद्धा आणि आनंदच्या सणासोबत जेव्हा विकासाचे पर्व देखील जोडला जाते तेव्हा आनंदी द्विगुणीत होतो.येथे काही दूर अंतरावरील कोलकाता मेट्रो आणि हायवेशी संबंधित प्रोजेक्ट्सच्या मुहूर्तमेढ आणि लोकार्पणांची संधी मला मिळाल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
पीएम मोदी यांनी जेसोर रोड मेट्रो स्टेशन ते नोआपारा-जय हिंद विमानबंदर मेट्रो सेवा, सियालदह-एस्प्लेनेड मेट्रो सेवा आणि बेलेघाटा-हेमंत मुखोपाध्याय मेट्रो सेवेला हिरवा झेंडा दाखवला. पीएम मोदी म्हणाले की भारत जगाची तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याकडे वाटचाल करत आहे.कोलकाता सारख्या शहरांची भूमिका मोठी आहे. या कार्यक्रमामुळे आज भारत आपल्या शहरांचा कायापालट करत असल्याचे हे उदाहरण आहे.