Narendra Modi : जो शिकेल, तोच जिंकेल… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज IIT दिल्लीच्या 57व्या दीक्षांत समारोहासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. 3000 हून अधिक ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना संबोधित करत पंतप्रधानांनी त्यांच्याशी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्लीच्या 57 व्या दीक्षांत समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. 587 पीएच.डी. (Ph.D.) संशोधकांसह पदवी प्राप्त करणाऱ्या 3 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी संबोधित केलं. आयुष्यातील एका अत्यंत अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घेत आहात, असं पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हटलं. यापूर्वी जेव्हा मी तुमच्याशी संवाद साधला होता, तेव्हा तो कोविड काळातील असल्याने आभासी (व्हर्च्युअल) माध्यमातून झाला होता असं ते म्हणाले. ‘जो शिकेल, तोच जिंकेल,’ असा कानमंत्रही पंतप्रधानांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. या कार्यक्रमाला शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?
अनेक मित्र आपल्या पहिल्या स्टार्टअपचं स्वप्न पाहत असतील, तर कोणी पुढच्या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली असेल. प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे. प्रत्येकाचं स्वप्न वेगळं आहे. यात एक गोष्ट अशी आहे ती सर्वांच्या मनात एक सारखी आहे, असं पंतप्रधान म्हणाले. जेव्हा तुमचा आयआयटी दिल्लीत पहिला दिवस होता, तो दिवस आठवा आणि आजच्या दिवसाचंही स्मरण करा. कालचीच तर गोष्ट आहे, तेव्हा ओरिएन्टेशन झालं आणि आता कन्वोकेशन होत आहे. तुम्हाला समाधान वाटत असेल. तुमच्या जीवनाच्या नव्या अध्यायाचा उत्साहही असेल. आजचा क्षण जगून घ्या, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी दिला.
येणाऱ्या काळात तुमच्यावर जबाबदाऱ्या वाढतील तेव्हा येथील जुन्या आठवणी तुम्हाला जुन्या काळात घेऊन जातील. तुम्हाला एनर्जेटिक करेल. प्रत्येक हॉस्टेल सोबतच्या तुमच्या आठवणी राहतील. कुमाऊ, आरा, कारा… बिंडी, नील, कैलास, हिमाद्री, इंटर हॉस्टेल कॉम्पिटेशनचे किस्से, जुने तंटे अशा अनेक गोष्टी असतील. इथून जाताना तुम्ही पुन्हा त्याचं स्मरण करा. केवळ शिक्षणाची गोष्ट नाही, असं मोदी म्हणाले.
विद्यार्थ्यांना दिला खास सल्ला
मित्रांनो, या भावूक क्षणी मी एक गोष्ट तुम्हाला जरूर सांगेल, जेव्हा जेव्हा जीवन तुम्हाला मागे वळून पाहण्याची संधी देईल, तेव्हा लक्षात ठेवा की ही कॅम्पस लाईफ, तुमचे मित्र, शिक्षक, मेंटॉर आणि स्टाफ हे तुमचं कुटुंब बनलं. तुमचे प्रोफेसरने तुम्हाला आकार दिला. तुमचं हे कॅम्पस हळूहळू तुमचं घर बनलं. तुमच्या प्रत्येक यशात तुम्ही या सर्वांची आठवण ठेवा, असं ते म्हणाले. या सर्वांबाबत कृतज्ञ व्हा. या गोष्टी असेट म्हणून घेऊन जा, त्या विसरून जाऊ नका. सोबत न्या. जाता जाता तुम्ही एकमेकांना भेटून जा हा माझा सल्ला असेल. कुठेही राहाल, तेव्हा प्रयत्न करा की हे नातं कायमचं राहील, असा सल्लाही मोदींनी दिला.