PM मोदींच्या कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल होणार; कोणाला मिळणार मंत्रिमंडळात संधी?

पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागंलं आहे.

PM मोदींच्या कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल होणार; कोणाला मिळणार मंत्रिमंडळात संधी?
pm narendra modi cabinet
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 28, 2026 | 10:23 AM

भाजपने आधी राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्वाचे बदल केले. पक्षात बदल केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी 2029 ची लोकसभा निवडणूक, अनेक राज्यातील विधानसभा निवडणूक , मंत्र्यांचे कामकाज, वय, पक्षाची मोर्चेबांधणीसाठी कॅबिनेटमध्ये फेरबदल केला जाण्याची शक्यता आहे.

केंद्रातील कॅबिनेटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित 69 सदस्य आहेत.  मंत्रिमंडळात संविधानिक सीमा ही 81 सदस्यांची आहे. याचा अर्थ आणखी 12 मंत्र्यांना कॅबिनेटमध्ये सहभागी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर काही पदे रिक्त झाले आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राज्यमंत्री जॉर्ज करियन आणि रवनीत सिंह बिट्टू यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना मंत्रि‍पदावरून हटवण्यात आलं.

मंत्रिमंडळात मिळणार तरुण नेते आणि महिलांना संधी 

भाजपच्या काही मंत्र्यांना पक्ष संघटनेतही नवीन जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे त्यांना मंत्रि‍पदावरून हटवलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हर्ष मल्होत्रा आणि पंकज चौधरी यांना राज्य पातळीवर पक्षाची जबाबदारी मिळाली आहे. तर पियुष गोयल यांची भाजपचे कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपमध्ये वयाचा फॅक्टर महत्त्वाचा मानला जातो. काही महिन्यांपूर्वी झालेल्या जेन-झी आंदोलनामुळे भाजप अलर्ट झाल्याचे बोलले जात आहे. कमीत कमी 12 कॅबिनेट मंत्री आणि स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री हे 70 हून अधिक वयाचे आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलात तरुण नेते आणि महिलांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीचा परिणाम दिसणार 

आगामी इतर राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा परिणाम या निर्णयावर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरातमधील विधानसभा निवडणुकीचा परिणाम पाहायला मिळू शकतो. कर्नाटक, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश , राजस्थान आणि महाराष्ट्रातील प्रतिनिधित्व कॅबिनेट मंत्रिमंडळात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे सहकारी मित्र देखील मंत्रिपदाची मागणी करू शकतात. शिंदे गट, टीडीपी आणि इतर सहकारी पक्षाच्या नेत्यांचाही विचार केला जाऊ शकतो. पंजाबमधील राजकीय संघटना आणि शिरोमणि अकाली दलाशी संबंधित नेत्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

Follow Us