AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाच्या विकासाचा मार्ग काय? न्यू इकॉनमी फोरममध्ये PM मोदींचं विधान

'ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी हजेरी लावली. या कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी भारताच्या विविधतेविषयी उपस्थितांना माहिती दिली.

जगाच्या विकासाचा मार्ग काय? न्यू इकॉनमी फोरममध्ये PM मोदींचं विधान
narendra modiImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 13, 2026 | 11:14 AM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरम’च्या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमाचे भारतात पहिल्यांदा आयोजन करण्यात आलं. अर्थव्यवस्थेशी निगडीत कार्यक्रमाचं योग्य वेळेत भारतात आयोजन केल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. त्यावेळी त्यांनी सत्तेचे खरे मूल्य हे त्याचा वापर कसा होतो, यावर असते, असे नरेंद्र मोदींनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यक्रमात सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी ब्लूमबर्ग यांचं कौतुक केलं. त्यांनी ब्लूमबर्ग आणि त्यांच्या मैत्रीविषयी भाष्य केलं. या कार्यक्रमात अर्थव्यवस्थेवर चर्चा होते. तंत्रज्ञान, एनर्जी आणि ग्लोबल अफेयर्सवर चर्चा होते. भारतात पहिल्यांदा या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. त्यांनी कार्यक्रमासाठी योग्य वेळ निवडली आहे’, असे त्यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी काय म्हणाले?

नरेंद्र मोदी म्हणाले, आता फोरम नव्या सत्ता केंद्रावर लक्ष केंद्रीत तरक आहे. 21 व्या शतकातील तिसऱ्या दशकात मोठे बदल होत आहेत.  जगात सत्ताकेंद्र बदलू लागले आहेत. तंत्रज्ञान, डेटा, ज्ञान, नाविन्यता ही सत्तेची केंद्र होत आहेत. आता सत्ता कोणाकडे हा प्रश्न नाही. तर प्रश्न असा आहे की, त्याचा वापर कसा होत आहे. तंत्रज्ञान फक्त काही लोकांना पुढे नेईल की, करोडो लोकांना पुढे नेईल? कोणाला नवीन संधी उपलब्ध निर्माण होईल. फक्त काही लोकांची ताकद वाढेल की सर्वांची क्षमता वाढवेल. येथून नवा विचाराचा जन्म होतोय. सत्ता ते सक्षम करणे…असा विचार निर्माण होत आहे. सत्तेच्या पुढेही अनेक विचार निर्माण होत आहे. सत्ता ते सक्षमीकरण या विचारासाठी आलो आहे. हा विचार भारतासाठी नवीन नाही. ज्ञान, धन आणि शक्ती ….ज्याच्याजवळ असेल, तो त्याचा वापर कसा करतो, हे महत्वाचं आहे. हाच विचार समजून घेतला पाहिजे. आम्ही परंपरेतून हे शिकलो आहे’.

मोदी पुढे म्हणाले, ‘भारतात 100 हून अधिक भाषा आहे. जवळपास 80000 नोंदणीकृत वृत्तपत्र आणि प्रकाशने आहेत.  1000 हून अधिक सॅटेलाईट्स टीव्ही चॅनल्स आहेत. भारतात 100 हून अधिक भाषणा बोलणारे जवळपास कोट्यवधी लोक आहेत. भारतात वेगवेगळ्या दृष्टीकोनावर चर्चा होते. सध्याच्या काळात या भाषा महत्वाच्या भूमिका निभावत आहे.

Follow Us
आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
CJP : आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?
बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; व्हिडिओ व्हायरल
Viral Video : बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; बुलडाण्यातील व्हिडिओ व्हायरल
अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय..
Abhijeet Dipke : अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज महत्त्वाची सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद