BJP Meeting In Hyderabad : हैदराबाद नव्हे भाग्यनगर! भाजपा कार्यकारिणी बैठकीत काय म्हणाले पंतप्रधान मोदी? रवीशंकर प्रसादांनी केलं स्पष्ट

हैदराबादला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाग्यनगर म्हटले आहे. येथूनच एक आता एक भारतवरून श्रेष्ठ भारत करण्याची जबाबदारी भाजपाच्या खांद्यावर आहे, असे भाजपा नेते रवीशंकर प्रसाद म्हणाले.

BJP Meeting In Hyderabad : हैदराबाद नव्हे भाग्यनगर! भाजपा कार्यकारिणी बैठकीत काय म्हणाले पंतप्रधान मोदी? रवीशंकर प्रसादांनी केलं स्पष्ट
नरेंद्र मोदी/रवीशंकर प्रसाद
Image Credit source: Twitter
| Updated on: Jul 03, 2022 | 5:44 PM

हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हैदराबादला भाग्यनगर (Bhagya Nagar) म्हणाले, जे आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखंड भारताचा पाया रचला आणि आता तो पुढे नेण्याची जबाबदारी भाजपाची आहे, असे वक्तव्य भाजपा नेते रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांनी केले आहे. ते हैदराबादमध्ये बोलत होते. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सध्या हैदराबादमध्ये सुरू आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच इतर महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हैदराबादमध्ये भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची ही बैठक आहे. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होत असतानाच भाग्यनगरचा म्हणजेच हैदराबादच्या नामांतराचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

‘एक भारताचा रचला होता पाया’

भारत अखंड ठेवण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोठे योगदान आहे. याच वल्लभभाई पटेल यांनी हैदराबादमध्ये एक भारताचा, अखंड भारताचा पाया रचला. मात्र तो तोडण्याचा खूप प्रयत्न त्याकाळी झाला, असे भाजपा नेते रवीशंकर प्रसाद म्हणाले. आता याच हैदराबादला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाग्यनगर म्हटले आहे. येथूनच एक आता एक भारतवरून श्रेष्ठ भारत करण्याची जबाबदारी भाजपाच्या खांद्यावर आहे, असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा हैदराबाद भाग्यनगरचा राग आळवला आहे.

काय म्हणाले रवीशंकर प्रसाद?

दोन दिवसीय बैठकीचा समारोप

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीच्या समारोपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी परेड ग्राऊंडवर जाहीर सभेला संबोधित करतील. त्याठिकाणी 35 हजारांहून अधिक नागरिक असतील. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राज्याचे मुख्यमंत्री केसीआर यांनी टीका केली आहे. महाराष्ट्राप्रमाणे तेलंगाणाचे सरकार पाडून दाखवा, असे आव्हानच त्यांनी भाजपाला दिले. त्याचबरोबर भाजपाच्या राजकारणावरही टीका केली. लोकशाहीसाठी हे लाजीरवाणे असल्याचेही ते म्हणाले. मोदींच्या स्वागतालादेखील ते उपस्थित नव्हते. याउलट ते यशवंत सिन्हा यांच्या स्वागतासाठी मंत्रिमंडळासह विमानतळावर गेले होते. त्यावरून भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली.