डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक…? पंतप्रधान नरेंद्र मोदी कुणाला म्हणाले Symbol Of hope?

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, सर्वांनीच व्हिडिओच्या माध्यमातून कंसल्टिंगच्या पद्धती विकसित केल्या पाहिजेत.

डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक...? पंतप्रधान नरेंद्र मोदी कुणाला म्हणाले Symbol Of hope?
Image Credit source: social media
| Updated on: Feb 11, 2023 | 1:18 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज गुजरात (Gujrat) राज्यातील अहमदाबाद येथे एका कार्यक्रमात महत्त्वाचं वक्तव्य केलंय. इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट (physiotherapist) च्या ६० राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. भाषणात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व फिजिओ थेरपीस्टचं अभिनंदन केलं. ते म्हणाले, कोणतीही जखम, वेदना असेल. तरुण, खेळाडू असो वा वृद्ध. कुणालाही त्रास होत असेल तर फिजिओथेरपीस्ट त्यांना मदत करून त्रास दूर करतात. आयुष्याच्या अत्यंत कठीण काळात ते Symbol of hope बनतात. आजच्या या परिषदेच्या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रातील एवढे प्रोफेसर एकत्रित जमा झाले आहेत. याब्बदल मी आनंद व्यक्त करतो. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिजिओ थेरपीस्टचे स्वागत केले. तसेच या क्षेत्रातील लोकांचं किती महत्त्व आहे, ते अधोरेखित केलं. त्यामुळेच आपल्या सरकारने फिजिओथेरपिस्टना आयुष्यमान योजनेशी जोडलं आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून सांगितलं.

‘उपचारासोबत धीरही देतात’

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, एखादी व्यक्ती अचानक जकमी होते. त्यावेळी त्याच्यासाठी ती केवळ शारीरिक जखम नसते. तर एक मानसिक धक्काही बसलेला असतो. अशा वेळी फिजिओ थेरपीस्ट केवळ उपचारच करत नाहीत तर त्या रुग्णाला धीरही देतात. त्यामुळे या क्षेत्रापासून मला नेहमीच प्रेरणा मिळते, असं मोदी यांनी म्हटलं.

‘प्रत्येक मोठ्या संकटात फिजिओथेरपीस्ट महत्त्वाचे’

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, सर्वांनीच व्हिडिओच्या माध्यमातून कंसल्टिंगच्या पद्धती विकसित केल्या पाहिजेत. उदा. सध्या तुर्कीत मोठा भूकंप आला आहे. अशा वेळी तेथे मोठ्या संख्येने फिजिओ थेरपीस्टची गरज आहे. तुम्ही मोबाइलद्वारेही तेथील लोकांना मदत करू शकता. देशातील वृद्धांची संख्या वाढतेय. त्यांच्या आरोग्याची देखभाल हे आव्हान आप्लयासमोर आहे. अशा वेळी देशातील फिजिओ थेरपीस्टनी आपलं कौशल्य दाखवण्याची नितांत आवश्यकता आहे..

मध्यम वर्गाची स्वप्न मोठी- पंतप्रधान मोदी

कार्यक्रमात पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, आयुष्यमान भारत योजना असो वा सरकारची सोशल सिक्युरिटी स्कीम.. या देशात एक मजबूत सोशल सिक्युरिटी नेट तयार झालंय. आज या देशातील गरीब आणि मध्यम वर्ग मोठी स्वप्न पाहतोय. ती पूर्ण करण्यासाठीची जिद्द ते बाळगून आहेत. आपल्या देशातील गरीबांना एका आधाराची गरज होती. बँकेत खातं उघडणं असो वा शौचालय बांधणं असो… किंवा नळाचं पाणी मिळवायचं असो.. केंद्र सरकारच्या अनेक योजनांद्वारे आम्ही लोकांपर्यंत हा आधार पोहोचवल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले.