AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारने घेतला मोठा निर्णय, आता PNG..

केंद्र सरकारने 'गॅस आणि पेट्रोलियम प्रॉडक्ट्स डिस्ट्रीब्यूशन ऑर्डर 2026' लागू केला आहे, ज्यामुळे देशातील नैसर्गिक वायू पायाभूत सुविधा बळकट होतील. या नवीन आदेशामुळे प्रकल्पांना वेळेवर मंजुरी मिळण्यास मदत होईल आणि व्यवसाय सुलभता वाढेल. भारताला वायू-आधारित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी, गुंतवणूक आणि स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारने घेतला मोठा निर्णय, आता PNG..
पाईप गॅस (PNG)
| Updated on: Mar 25, 2026 | 3:46 PM
Share

देशातील नैसर्गिक वायू पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या आणि व्यवसाय सुलभता सुधारण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने एक आदेश जारी केला आहे. या निर्णयामुळे प्रकल्पांना वेळेवर मंजुरी मिळण्याची आणि विलंब झाल्यास मंजुरी मिळाल्याचे मानले जाण्याची तरतूद आहे, ज्यामुळे प्रक्रियेतील अनावश्यक विलंब कमी होईल. भारताला वायू-आधारित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. हा नवीन आदेश म्हणजे त्या दिशेने टाकलेलं एक मोठे पाऊल आहे. यामुळे गुंतवणूक, नवोपक्रम आणि स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन मिळेल. ही नवीन प्रणाली शुल्क आणि कार्यपद्धतींचे मानकीकरण करते, ज्यामुळे पारदर्शकता वाढेल आणि अंदाज व नियोजन करणं कंपन्यांसाठी सोपं होईल.  विविध प्रदेशांमध्ये गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी आणि त्यांचा विस्तार करण्यासाठी अधिकृत संस्थांना विनाअडथळा प्रवेश सुनिश्चित करण्याच्या गरजेवर सरकारने भर दिला आहे. या निर्णयामुळे देशभरातील गॅस नेटवर्कच्या विस्ताराला गती मिळेल, असा सरकारचा दावा आहे.

गॅस आणि पेट्रोलियम प्रॉडक्ट्स डिस्ट्रीब्यूशन ऑर्डर 2026 लागू

खरंतर केंद्र सरकारने एनर्जी सेक्टरमध्ये मोठं पाऊल उचलत गॅस आणि पेट्रोलियम प्रॉडक्ट्स डिस्ट्रीब्यूशन ऑर्डर 2026 लागू केलं आहे. देशभरात गॅस पाइपलाइन टाकणे, विस्तार करणे आणि चालवण्याची प्रक्रिया सुलभ व वेगवान करणे हा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत जारी केलेल्या या आदेशाचा उद्देश आहे.  ‘गॅझेट ऑफ इंडिया’मध्ये प्रकाशित झालेला हा आदेश तात्काळ अंमलात आला आहे. तसेच, सामान्य ग्राहकांना पाइपद्वारे मिळणाऱ्या नैसर्गिक वायूची (PNG) उपलब्धता वाढवण्यासाठी यात ग्राहक-केंद्रित सुधारणांचाही समावेश करण्यात आला आहे.

काय आहे नवा नियम ?

यातील नव्या नियमांअतर्गत, पाइपलाइन प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्यांसाठी एक निश्चित कालावधी ठरवण्यात आला आहे. याचाच अर्थ असा की आता कंपन्यांना मंजुरीसाठी महिनोन्महिने वाट पाहावी लागणार नाही.  जर ठराविक वेळेत परवानगी मिळाली नाही, तर ती आपोआप मंजूर झाली असे मानले जाईल, ज्यामुळे प्रकल्पांना होणाऱ्या विलंबाची समस्या मोठ्या प्रमाणात दूर होईल आणि गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढेल.

देशात पाईपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) नेटवर्कचा वेगाने विस्तार करणे, शेवटच्या टप्प्यापर्यंत वितरण सुनिश्चित करणे आणि स्वयंपाक, वाहतूक व उद्योगांमध्ये स्वच्छ इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देणं हा सरकारचा उद्देश आहे. यामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत होईल आणि वायू-आधारित अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. या निर्णयाचा थेट परिणाम ग्राहक आणि उद्योग या दोघांवरही होणार आहे. PNG जोडण्या वेळेवर वितरित करण्याची तरतूद करण्यात आली आहे आणि जिथे शक्य असेल तिथे LPG वरून PNG च्या बदलास प्रोत्साहन दिले जाईल.

Follow Us
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... कारण काय?
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... नेमकं काय घडलं?
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा!
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा! सरकारला थेट आवाहन
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द...
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द का करता? सरकारला थेट सवाल
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...  चक्क धनंजय मुंडेंसमोर हे काय घडलं?