फौजदार बापाचा, DSP लेकीला ऑनड्युटी सॅल्युट

इन्सपेक्टर वाय श्याम सुंदर ( Y Shyam Sundar)यांनी त्यांची मुलगी वाय जेस्सी प्रसांथी (Y Jessi Prasanthi) हिला सॅल्युट ठोकला.

फौजदार बापाचा, DSP लेकीला ऑनड्युटी सॅल्युट
जेस्सी प्रसांथी श्याम सुंदर
Follow us
| Updated on: Jan 06, 2021 | 10:37 AM

तिरुपती : आपल्याकडे वडील मुलगा, वडील- मुलगी राजकारणात कतृत्व गाजवताना दिसतात. मात्र,आंध्र प्रदेशातील तिरुपतीमध्ये अशाच स्वरुपाचा पण वेगळा प्रसंग पाहायला मिळाला. आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे राज्यातील पोलिसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमानिमित्त तिरुपती येथे आलेल्या सर्कल इन्सपेक्टर वाय श्याम सुंदर ( Y Shyam Sundar)यांनी त्यांची मुलगी वाय जेस्सी प्रसांथी (Y Jessi Prasanthi) हिला सॅल्युट ठोकला. या प्रसंगामुळे वडील लेकीसह उपस्थित पोलीसही भावूक झाले. ही अनोखी घटना रविवारी घडली यामुळे वडील मुलगी भावनिक झालेले पाहायला मिळाले. दोघेही आंध्र प्रदेशात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सेवा बजावत आहेत. (Police Inspector Y Shyam Sundar saluting DSP daughter Y Jessi Prasanthi at Tirupati during Police meet)

वडिलांच्य्या सॅल्युटला लेकीचाही सॅल्युट

आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे 4 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान पोलिसांच्या विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पोलीस दलातील अधिकारी तिरुपती येथे जमले आहेत. वाय श्याम सुंदर यांची मुलगी वाय जेस्सी प्रसांथी सध्या गुंटूर जिल्ह्यात पोलीस उपअधीक्षक पदावर कार्यरत आहे. श्याम सुंदर आणि जेस्सी प्रसांथी ड्युटीवर असताना प्रथम एकमेकांसमोर आले. यामुळे श्याम सुंदर यांनी त्यांच्या लेकीला सॅल्युट ठोकला. वडिलांनी सॅल्युट केल्यानंतर जेस्सी प्रसांथी यांनी इन्स्पेक्टर वडिलांना सॅल्युट केला.

जेस्सी प्रसांथी यांनी माध्यमांशी बोलताना वडिलांनी सॅल्युट ठोकला त्यावेळी गोंधळल्यासारखं झाल्याचं सांगितले. जेस्सी प्रसाथी यांनी 2018 मध्ये पोलीस सेवा जॉईन केली आहे. 2018 पासून प्रथमच वडील आणि मुलगी ड्युटीवर असताना समोरासमोर आले. वडिलांना सॅल्युट करु नका, असं सांगूनही त्यांनी सॅल्युट केल्याचं जेस्सी प्रसांथी म्हणाल्या.

माझे वडिलचं माझी प्रेरणा आहेत, असही जेस्सी प्रसांथी म्हणाल्या. वडिलांना पोलीस दलात काम करताना बघून वाढले, असं जेस्सी प्रसांथी म्हणाल्या. पोलीस दलात काम करताना वडिलांनी अनेकांची मदत केली. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच पोलीस दलात सेवा करण्याचा निश्चय केला, असं जेस्सी प्रसांथी म्हणाल्या.

तेलंगाणामध्येही 2018 मध्ये अशीच घटना

तेंलंगणा राज्यामध्येही वडिलांनी लेकीला सॅल्युट ठोकल्याची घटना 2018 मध्ये घडली होती. डीएसपी उमा महेश्वर शर्मा यांनी त्याची मुलगी सिंधू शर्मा हिला सॅल्यूट ठोकला होता. सिंधू शर्मा पोलीस दलात 2014 मध्ये जॉईन झाल्या होत्या.

आंध्र प्रदेश पोलिसांचे ट्विट

संबंधित बातम्या:

World Braille Day | अपघाताने अंध झालेल्या व्यक्तीने लावला ‘ब्रेल’ लिपीचा शोध, वाचा लुईस ब्रेल यांच्याविषयी…

नववर्षाच्या मुहुर्तावर नांदेडच्या शेतकऱ्याची मेहनतीची वांगी फळाला, 40 दिवसांत 3 लाखांचा नफा!

(Police Inspector Y Shyam Sundar saluting DSP daughter Y Jessi Prasanthi at Tirupati during Police meet)

Non Stop LIVE Update
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.