
एका फार्म हाऊसवर काही तरी सुरू असल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली. मग पोलिसांनी रात्री मोठी कारवाई केली. पोलीस पोहचले त्यावेळी, फार्म हाऊस समोर अनेक महागड्या गाड्यांची रांगच लागली होती. पोलिसांनी आत प्रवेश केला, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. या ठिकाणी पोलिसांनी आक्षेपार्ह साहित्य, वस्तू जप्त केल्या. याठिकाणी 18 मुलं आणि 10 मुली आल्या होत्या. त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या घरच्यांना हा प्रकार कळवला.
फार्महाऊसवर पोलिसांचा छापा
उदयपूरमध्ये पोलिसांनी एका फार्म हाऊसवर छापा टाकला. तेव्हा आता रेव्ह पार्टी आणि वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आली. गोगुंदा या परिसरातील हे दोन फार्म हाऊस अनेक दिवसांपासून बंद होते. पण अचानक येथे लोकांची ये जा वाढली होती. एका फार्म हाऊसमध्ये रेव्ह पार्टी तर दुसरीकडे वेश्या व्यवसाय सुरू होता. खबऱ्यांनी याविषयीची पक्की माहिती पोलिसांना दिली होती.
पोलिसांकडे वाढल्या होत्या तक्रारी
उदयपूर आणि आसपासच्या परिसरात अंमली पदार्थ आणि वेश्या व्यवसाय होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्यातच फार्म हाऊस हे पोलिसांच्या रडारवर होते. काही फार्म हाऊसवर असे प्रकार होत असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर पोलिसांनी खबऱ्यांचे नेटवर्क सक्रिय केले होते. माहिती मिळताच रविवारी रात्री पोलिसांनी या दोन फार्म हाऊसवर छापे टाकले. तेव्हा एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी पकडलेल्या सर्व मुली या राजस्थानमधील नाही तर बाहेरील राज्यातील असल्याचे तपासात पुढे आले.
माताजी खेडा या परिसरातील पियाकल प्रियंका पीपी फार्म हाऊस आणि खुमानपुरा येथील द स्काई हॉलीडे फार्म हाऊसवर पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांनी येथे एका परदेशी नागरिकाला पण अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 3,20,000 रुपये मुल्यांचे डॉलर जप्त केले. पकडलेल्या सर्व मुली या राजस्थानमधील नाही तर बाहेरील राज्यातील असल्याचे तपासात पुढे आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे सध्या या परिसरात खळबळ उडाली आहे. तर पोलिसांनी जी मुलं सापडली आहेत. त्यांच्या कुटुंबियांना पोलीस स्टेशनला बोलवल्याची माहिती समोर येत आहे.