एसी कोचमध्ये आला टीसी; मग काय एकच धांदल उडाली, कोणी लपले सीट खाली, चौघांनी टॉयलेटमध्ये धाव घेतली
TT at AC Coach : रेल्वेत टीसी आल्यावर अनेकांना का घाम फुटतो? हे सांगायची गरज आहे का? पण टीसी केवळ तिकीटच तपासतो हा भ्रम खोटा आहे. टीसी इतर पण गोष्टी तपासतो. मग काय होते कारवाई, हे तुम्हीच वाचा...

Indian Railway TT : रेल्वेत नियमित तिकीट तपासणी होतेच. अनेकजण अशावेळी खुश्कीचा मार्ग म्हणजे टॉयलेटमध्ये लपतात. तर काही जण सीट खाली दडतात. पण आता ही चालाखी टीसी ओळखून आहेत. ते फुकट्या प्रवाशांना पकडतातच. सध्या उत्तर मध्य रेल्वेने खास अभियान राबवले आहे. त्यामुळे प्रवाशांची एकच धांदल उडाली आहे. टीटीने केवळ तिकीटच तपासणी केली नाही तर अनियमित यात्रा करणार्यांना पण पकडले. रेल्वेत अस्वच्छता करणारे आणि विना तिकीट सामान वाहून नेणाऱ्या प्रवाशांवर सुद्धा कारवाई करण्यात आली.
चालाकी नाही चालली
आग्रा विभागात एका टीटीला तर एक खतरनाक अनुभव आला. तो जसा एसी कोचमध्ये चढला. तेव्हा काहींनी खिडकीबाहेर पाहायला सुरूवात केली. तर काही जण घाईगडबडीत टॉयलेटकडे पळाले. काहींनी मुलांना सीट खाली लपवले. मग टीटी महाशयांनी जाहीर केले की तो या कोचमध्ये एक तास थांब थांबणार आहे. त्यामुळे अनेकांची भीतीने गाळण उडाली. आता तिकीटासह दंडाची रक्कम भरण्याशिवाय पर्याय नाही हे प्रवाशांनी ओळखले.
तर एका प्रवासाने तर थेट नोटांचे बंडल टीटीच्या हातावर टेकवले. आता मोजून घ्या, कमी पडले तर मला सांगा, असे सांगून प्रवासी शांत झाला. तेव्हा टीटीने एसी कोचचे तिकीट, दंडाची रक्कम त्याच्याकडून वसूल केली. अशा कारवायांमुळे रेल्वेला मोठा फायदा होत आहे. रोज मोठी कमाई होत आहे. अनेक फुकट्या प्रवाशांना रेल्वेने दंड ठोठावला आहे. त्यात आर्थिक परिस्थिती चांगली असणार्या प्रवाशांचा पण समावेश आहे. तिकीट प्रक्रिया आणि वेटिंगबाबत अजून सुधारणा करण्याची मागणी अनेक प्रवाशांनी या कारवाईनंतर व्यक्त केली आहे. अनेकांना दुसर्या शहरात लवकर पोहचायचे असते. पण तिकीट कन्फर्म होत नाही. त्यामुळे अनेकांना अवैध प्रवास करावा लागत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
कारवाईचे आकडे काय सांगतात
- एकूण 48,867 प्रवाशांना पकडले
- 3.03 कोटींचा दंड वसूल केला
- विना तिकीट प्रवास करणारे 22,975 प्रवासी, 1.72 कोटींचा दंड
- लगेज शुल्क न देणाऱ्या 4 प्रवाशांकडून 3,670 रुपये वसूल
- अस्वच्छता करणाऱ्या 427 प्रवाशांना 46,250 रुपयांचा दंड
तिकीट घेऊनच प्रवास करा
तर दुसरीकडे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. तर सोबत जास्त वजनाचे सामान असेल तर त्याचे तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. तसेच रेल्वेत अस्वच्छता न करण्याचे बजावले आहे. रेल्वे ही राष्ट्रीय संपत्ती आहे. तिचे नुकसान करू नका. ती अस्वच्छ करू नका असे आवाहन रेल्वेने केले आहे.
