AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! तामिळनाडूमध्ये मोठा राजकीय भूकंप? एआयएडीएमके, डीएमके एकत्र येणार? हालचाली वाढल्या

विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर आता तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी आकड्यांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली असून, राज्यात मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता आहे.

मोठी बातमी! तामिळनाडूमध्ये मोठा राजकीय भूकंप? एआयएडीएमके, डीएमके एकत्र येणार? हालचाली वाढल्या
Thalapathy Vijay Image Credit source: tv 9 मराठी
| Updated on: May 06, 2026 | 10:00 PM
Share

विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर आता तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी आकड्यांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने डीएमके आणि एआयएडीएमके या दोन्ही पक्षांना मोठा धक्का दिला आहे. तामिळनाडूनमध्ये टीव्हीकेच्या सर्वाधिक 108 जागा निवडून आल्या आहेत. तामिळनाडूमध्ये सत्तास्थापनेसाठी बहुमताचा आकडा 118 एवढा आहे. परंतु हा जादुई आकडा गाठण्यात कोणत्याच पक्षाला यश न आल्यानं राज्यात सत्ता स्थापनेचा पेच वाढला आहे. टीव्हीकेला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. परंतु टीव्हीकेचे 108 आमदार आणि काँग्रेसचे 4 अशा 112 च आमदारांचं संख्याबळ सध्या टीव्हीकेकडे आहे. त्यांना सत्ता स्थापनेसाठी आणखी 6 आमदारांची गरज आहे.

दरम्यान आज थलपती विजय यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे. टीव्हीके कडून राज्यपालांना 112 आमदारांच्या सह्यांचं पत्र देखील देण्यात आलं आहे. मात्र राज्यपालांनी टीव्हीकेला 118 आमदारांचं पत्र सादर करण्यास सांगितलं आहे. दरम्यान या सर्व घडामोडी घडत असताना आता तामिळनाडूमध्ये एआयएडीएमके आणि डीएमके युती करून सत्ता स्थापन करू शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे थलपती विजय यांनी एआयएडीएमकेकडे पाठिंब्याची मागणी केली होती. मात्र एआयएडीएमकेने टीव्हीकेला पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. याबाबत पक्षाकडून आपली भूमिका देखील स्पष्ट करण्यात आली आहे. आम्ही टीव्हीकेला पाठिंबा दिला, या बातम्यांमध्ये कोणंतही तथ्य नसल्याचं एआयएडीएमकेने म्हटलं आहे. त्यामुळे आता सर्वाधिक जागा येऊन देखील सत्ता स्थापन करण्यासाठी टीव्हीकेला तारेवरची कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे एआयएडीएमके आणि डीएमकेच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास या निवडणुकीमध्ये एआयएडीएमकेला 47 जागा मिळाल्या आहेत, तर डीएमकेला 59 जागा मिळाल्या आहेत, दोन्ही पक्षांनी युती केली तर त्यांचं संख्याबळ 106 होतं, त्यांना बहुमतासाठी 12 आमदारांची आवशकता आहे. त्यामुळे त्यांना इतर पक्षांचा देखील पाठिंबा घ्यावा लागणार आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर टीव्हीकेनं राज्यपालांकडे वेळ मागितल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे डीएमके आणि एआयएडीएमके युती करणार असल्याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे. जर हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन ते सत्ता स्थापन करण्यास यशस्वी झाले तर मात्र टीव्हीकेला विरोधी पक्षात बसण्याची वेळ येऊ शकते.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं