राहुल गांधी विसरलेत का? प्रल्हाद जोशींनी गांधींना करून दिली ‘त्या’ पत्राची आठवण

देशात सध्या बिहार विधानसभा निवडणूकीची चर्चा आहे. या निवडणूकीपूर्वी मतदार याद्या दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. राहुल गांधींसह अनेक विरोधी पक्षांनी याला विरोध केला आहे. याला केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी उत्तर दिले आहे.

राहुल गांधी विसरलेत का? प्रल्हाद जोशींनी गांधींना करून दिली त्या पत्राची आठवण
Pralhad Joshi
| Updated on: Aug 08, 2025 | 7:27 PM

देशात सध्या बिहार विधानसभा निवडणूकीची चर्चा आहे. या निवडणूकीपूर्वी मतदार याद्या दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. मात्र राहुल गांधींसह अनेक विरोधी पक्षांनी याला विरोध केला आहे. यामुळे आमचे मतदार कापले जात असल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे. अशातच आता यावर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी भाष्य केले आहे. त्यांनी गांधींना त्यांच्याच एका पत्राची आठवण करुन दिली आहे.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, ‘बिहारमध्ये सुरू असलेली मतदार यादीची दुरुस्ती प्रक्रिया नवीन नाही. यापूर्वीही अशी दुरुस्ती झालेली आहे. आता राहुल गांधींच्या तक्रारीनंतर ही प्रक्रिया करण्यात येत आहे. आता निवडणूक आयोग दुरुस्त्या करत असताना, विरोधी पक्ष त्यावर आरोप करत आहेत.’

प्रल्हाद जोशी पुढे बोलताना म्हणाले की, ‘राहुल गांधींनी त्यांच्या पत्रात जी मागणी केली होती ते निवडणूक आयोग करत आहे. त्यांनी स्वतः म्हटले होते की मतदार यादीत चुका आहेत आणि त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. आता दुरुस्ती केली जात आहे, यावर राहुल गांधी म्हणत आहेत की आमचे मतदार चोरीला जातील. राहुल गांधी विसरलेत का की त्यांनीच अशी मागणी केली होती. जर राहुल गांधींच्या पत्राची दखल घेतली नाही तरी त्यांना अडचण आहे आणि घेतली तरी त्यांना अडचण आहे.’

41 लाख मतदार वगळले जाण्याची शक्यता

सध्या मतदार याद्या दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यात बिहारमधील 41 लाखांहून अधिक मतदार वगळले जाण्याची शक्यता आहे. काही काळापूर्वी हाच आकडा 35.6 लाख इतका होता. यामुळे विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजप आमचे मतदार हटवत असल्याचे विरोधकांनी म्हटलं आहे.

तेजस्वी यादव यांच्याकडून विरोधकांना एकवटण्याचे आवाहन

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मतदार यांद्यांच्या दुरुस्तीबाबत 35 प्रमुख राजकीय पक्षांना पत्र लिहून पाठिंबा माहितला आहे. बिहारमध्ये सुरू असलेली ही प्रक्रिया लोकशाहीवर हल्ला आहे. यामुळे लाखो मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहण्याची शक्यता आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगासारखी स्वतंत्र संस्थाही आता जनतेचा विश्वास गमावत आहे.