पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज पूर्वांचल एक्सप्रेस वे चे उद्घाटन; सोहळ्यात रंगणार ‘मिराज’ ‘सुखोई’च्या कसरतींचा थरार

| Updated on: Nov 16, 2021 | 8:05 AM

आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते पूर्वांचल एक्सप्रेस वेचे उद्घाटन होणार आहे. 341 किलोमीटरच्या या एक्सप्रेस वे ला तयार करण्यासाठी 36 महिन्यांचा कालावधी लागला आहे.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज पूर्वांचल एक्सप्रेस वे चे उद्घाटन; सोहळ्यात रंगणार मिराज सुखोईच्या कसरतींचा थरार
Follow us on

लखनऊ – आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते पूर्वांचल एक्सप्रेस वेचे उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पूर्वांचल एक्सप्रेस वे ला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. 341 किलोमीटरच्या या एक्सप्रेस वे ला तयार करण्यासाठी 36 महिन्यांचा कालावधी लागला असून, 22 हजार पाचशे कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

‘एक्सप्रेस वे मुळे विकासाची गंगा अवतरणार ‘

आज नरेंद्र मोदी या एक्सप्रेस वेचे उद्घाटन करणार आहेत. याबाबत माहिती देताना योगी म्हणाले की, हा एक्सप्रेस वे पूर्वेकडील राज्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. यामुळे या राज्यांमध्ये विकासाची गंग येणार आहे. हा रस्ता उत्तरप्रदेश आणि बिहार अशा दोनही राज्यांसाठी महत्त्वाचा आहे. दरम्यान या उद्घघाटनाबाबत केंद्रीय परिवहन आणि रस्ते निर्मिती मंत्री नितीन गडकरी यांनी देखील टि्वट करत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे की, मंगळवारचा दिवस उत्तरप्रदेशसाठी खास आहे. मी त्यासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करतो.

 

 लढाऊ विमानांचा एअर शो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या रस्त्याचे उद्घघाटन होणार आहे. यावेळी मोदींच्या समोर एअर शो देखील सादर केला जाणार आहे. या एअर शोमध्ये मिराज- 200, सुखोई -30 आणि जग्वार ही लढावू विमाने सहभागी होतील. या रस्त्याचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे या एक्सप्रेस वेवर हवाईपट्टी देखील बनवण्यात आली आहे. मोदी जेव्हा उद्घाटनाच्या कार्यक्रमाला येतील, तेव्हा ते आपल्या विमानातून याच हवाईपट्टीवर उतरुन कार्यक्रमात सहभागी होतील.

 

संबंधित बातम्या 

देशात कोरोना लसीकरणाला वेग; आतापर्यंत112.91 कोटींहून अधिक जणांना दिला डोस

नोव्हेंबरमध्ये सर्व राज्यांना अतिरिक्त 47,541 कोटी रुपये निधी मिळणार, केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा