
भारतीय जनता पक्षाची निवडणूक रणनिती आणि गुजरातमध्ये भाजपला सातत्याने मिळणारे यश, यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले. नरेंद्र मोदी यांनी TV9 ला एक्सक्लूझिव्ह मुलाखत दिली.‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांच्यासह TV9 ग्रुपच्या पाच व्यवस्थापकीय संपादकांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत गुजरात भाजपला वारंवार का विजयी करतो, यासंदर्भातील फॉर्मूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उघड केला. या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये भाजपला सातत्याने मिळत असलेल्या विजयाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले की, संघटनात्मकरित्या, सामाजिकरित्या आणि आर्थिकदृष्टीने गुजरातला आम्ही सक्षम केले आहे. समाजातील सर्व वर्गाचे नेतृत्व भाजपच्या संघटनेत आहे. छोट्यातल्या छोटा घटकातील लोक भाजपच्या संघटनेत आहेत. ही सर्व समावेशक आणि सर्वस्पर्शी संघटना आहे. सत्तेत राहिल्यानंतर संघटनेला निगलेक्ट केले नाही. पहिल्या दिवसापासून गरीबांच्या कल्याणाची कामे करत आहे.
गुजरातमध्ये काम करण्यासारख्या खूप संधी आहे. पूर्वी दुष्काळ व्हायचा. गुजरातमध्ये पाणी नियोजनात बजेट अधिक खर्च व्हायचा. आम्ही पाण्यावर खूप काम केले. गुजरातमध्ये मीठ शिवाय दुसरे काही नव्हते. टेक्स्टाईल इंडस्ट्री संपली होती. आम्ही ट्रान्स्पोर्टेशन मिळाले तर मीठ विकायचो. गुजरात ट्रेडर स्टेट बनले होते. शेती चांगली पिकत नव्हती, उद्योग नव्हते. त्यामुळे या क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत केले. गुजरात १० टक्के विकास दर असणारे कृषी राज्य बनले. उद्योगांना चालना देण्यासाठी अनेक कामे केली. देशातील दहापैकी ८ डायमंड गुजरामध्ये होतात. त्यामुळे गुजरातमध्ये भरभराट झाली आहे. हे त्या ठिकाणी असलेल्या सर्व लोकांच्या मेहनतीने झाले आहे.
निवडणूक माझ्यासाठी नवीन नाही. मी अनेक वर्षापासून संघटनेत राहून निवडणूक लढवण्याचं काम केलं. त्यानंतर माझ्यावर आयुष्यात पहिल्यांदा गुजरातमधून निवडणूक लढवण्याची वेळ आली. आता मी आणखी एका वेगळ्या भूमिकेत आहे. देश आणि दुनियाच्या नजरेत एका विशेष जबाबदारीसह मी या निवडणुकीच्या मैदानात आहेत. २०१४च्या निवडणुकीत जेव्हा आम्ही मैदानात होतो, त्यावेळी लोकांच्या मनात अनेक प्रश्न होते. मोदी नवे आहेत. कोण आहेत. गुजराती बोलतात. पण लोकांच्या मनात आशा होती. २०१४मध्ये आशा होती. काही तरी करेल. जेव्हा २०१९च्या निवडणुकीत गेलो तेव्हा जी आशा होती, त्याचं विश्वासात रुपांतर झालं होते