पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टचे भाषण करण्यास दिला होता नकार, रात्री 2 वाजता..

नुकताच अत्यंत मोठा खुलासा झाला. त्यामध्येच मोठी बातमी पुढे येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट चे भाषण करण्यास मनाई केली होती. त्यांनी एक अट ठेवली जर ती अट पूर्ण नाही झाली तर मी भाषण करणार नसल्याचे त्यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टचे भाषण करण्यास दिला होता नकार, रात्री 2 वाजता..
Prime Minister Narendra Modi
| Updated on: Aug 16, 2026 | 8:24 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी देशातील नागरिकांना संबोधित केले. यापूर्वी पंतप्रधान बुलेटप्रूफ काचेतून भाषण देत होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की, जर हा बुलेटप्रूफ काच काढला गेला नाही तर मी भाषण करणार नाही. त्यानंतर दिल्लीत रात्री 2 वाजता मोठ्या घडामोडी घडल्या. 2014 पासून या प्रोटोकॉल बदलण्यात आला. 14 ऑगस्टच्या रात्री नक्की काय घडले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण न करण्याचा निर्णय नक्की का घेतला होता? हे सर्व माजी रक्षा सचिव आरके माथुर यांनी सांगितले. माजी रक्षा सचिव आरके माथुर म्हणाले, की, रात्री पंतप्रधानांनी सांगितले की, तो काच काढला गेला नाही तर मी भाषण करणार नाही. ज्यानंतर रात्री उशिराला प्रोटोकॉलमध्ये मोठा बदल करण्यात आला.

स्वातंत्र्य दिवसाच्या एक दिवस अगोदर इंटेलिजेंस ब्यूरोकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या सुरक्षेचा आढावा देण्यात आला. यादरम्यान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या बुलेटप्रूफ काचेबद्दल सांगण्यात आले. त्यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, हा काच लावलेला असेल तर मी देशावायिकांना व्यवस्थित संबोधित करू शकणार नाही. अधिकाऱ्यांना हा काच काढणे अजिबात योग्य वाटत नव्हते.

त्यांना पंतप्रधानांची चिंता होती. कारण लाल किल्ल्याजवळ व्यस्त चांदणी चाैक आहे. बाजूलाच मोठा परिसर आहे. मोठ्या इमारती आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी पुन्हा यावर विचार करण्यास नरेंद्र मोदी यांना सांगितले. पण ते आपल्या मागणीवर ठाम राहिले. जर तो काच उद्या मी भाषण करावे तुम्हाला वाटत असेल तर काच काढावाच लागेल.

रात्री उशिरा अधिकाऱ्यांनी बॅरियर काढत आयबी चीफ यांच्यासोबत मिळून मोठा निर्णय घेतला. रात्री उशिरा तो बलेलप्रूफ काच काढण्यात आला. यादरम्यान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर भाषण दिल्यानंतर थेट विद्यार्थ्यांमध्ये पोहोचले. ज्यावेळी नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांमध्ये पोहोचले, त्यावेळी एक विद्यार्थीने त्यांच्या पाया पडण्याचा प्रयत्नही केला. त्यावेळी तिची टोपी खाली पडली तर नरेंद्र मोदी यांनी ती टोपी उचलून त्या मुलीच्या डोक्यावर घातली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us