AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला सुनावले, इंडिया आघाडीच्या बैठकीत काय घडलं? इन्साइड स्टोरी आली समोर

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला स्वतंत्र आंदोलनासाठी सुनावले. एका मोठ्या आंदोलनाची गरज असल्याचे ते म्हणाले. या बैठकीत ६ ऑक्टोबरला दिल्लीत निवडणूक आयोगावर मोर्चा काढण्याचा आणि २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान 'लोकशाही बचाव' आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला सुनावले, इंडिया आघाडीच्या बैठकीत काय घडलं? इन्साइड स्टोरी आली समोर
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 30, 2026 | 3:53 PM
Share

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्यासाठी आज इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीला इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्षाचे नेते उपस्थित होते. काही नेत्यांनी बैठकीला ऑनलाइन हजेरी लावली होती. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ऑनलाइन हजेरी लावली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भर मिटिंगमध्ये काँग्रेसला सुनावले. काँग्रेसने महाराष्ट्रासह देशभरात स्वतंत्रपणे आंदोनल सुरू केलं आहे. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला चांगलंच सुनावलं.

उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत 10 मिनिटे आपलं म्हणणं मांडलं. यावेळी त्यांनी स्वतंत्रपणे आंदोलन करण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. इंडिया आघाडीने एक मोठं आंदोलन करायला हवं. आघाडीच्या बॅनरखाली सर्वांनी एकत्र येऊन ताकद दाखवली पाहिजे. पण पक्षाने वेगवेगळे कार्यक्रम करणं हे योग्य नाही. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे धरने आंदोलन करत आहे. हे योग्य नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

काँग्रेसचे आदेश

येत्या 4 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात शिवसेनेने निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन पुकारलं आहे. यापुढे इंडिया आघाडीने एकत्रित येऊन निवडणूक आयोग आणि मोदी सरकारला घेरण्यासाठी प्रभावी आंदोलन केलं पाहिजे, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. दरम्यान, ज्ञानेश कुमार यांचा कथित निवडणूक घोटाळा समोर आल्यानंतर काँग्रेसने प्रदेश पातळीवर आंदोलन करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे काँग्रेसचं स्वतंत्र आंदोलन झालं.

खरगे काय म्हणाले?

या बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही आपली भूमिका व्यक्त केली. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला पाहिजे. निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर गंभीर आरोप झाले आहेत. त्यांच्याच सहकाऱ्यांनी हे आरोप केले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगावरची विश्वासहार्यता कमी झाली आहे. यामुळेच ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला पाहिजे, असं खरगे म्हणाले.

बैठकीत काय ठरलं?

या बैठकीला 20 पक्षाचे नेते उपस्थित होते. यावेळी येत्या 6 ऑक्टोबर रोजी दिल्लीत निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोर्चात सर्व विरोधी पक्षनेते सहभागी होणार आहेत. तसेच 2 ते 8 ऑक्टोबरपर्यंत देशात ‘लोकशाही बचाओ’ आंदोलन करण्यात येणार आहे. इंडिया ब्लॉकचे सदस्य, एनजीओ आणि सिव्हिल सोसायटीतील सदस्य हे आंदोलन करतील, अशी माहितीही खरगे यांनी दिली. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसायचे नाही, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...