संसदेचं कामकाज बंद का? पत्रकारांनी प्रश्न विचारताच प्रियंका गांधी भडकल्या, म्हणाल्या…

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, मात्र दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे कामकाज वारंवार ठप्प होत आहे. आजही कामकाज ठप्प झाल्यानंतर संसदेबाहेर काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांना पत्रकारांनी कामकाजाबाबत प्रश्न विचारला होता. यानंतर त्या भडकलेल्या पहायला मिळाल्या.

संसदेचं कामकाज बंद का? पत्रकारांनी प्रश्न विचारताच प्रियंका गांधी भडकल्या, म्हणाल्या...
Priyanka Gandhi Angry
Image Credit source: Google
| Updated on: Jul 23, 2026 | 4:13 PM

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, मात्र दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे कामकाज वारंवार ठप्प होत आहे. आजही कामकाज ठप्प झाल्यानंतर संसदेबाहेर काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांना पत्रकारांनी कामकाजाबाबत प्रश्न विचारला होता. यानंतर त्या भडकलेल्या पहायला मिळाल्या. तुम्ही नेहमी सरकारला हवे असलेलेच प्रश्न विचारता. हेच प्रश्न सरकारला का विचारत नाही? असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

प्रियंका गांधी भडकल्या?

संसदेच्या बाहेर पडताच पत्रकारांनी त्यांना संसदेचे कामकाज बंद का असा प्रश्न विचारला. यावर बोलताना त्यांनी म्हटले की, ‘तुम्ही नेहमी सरकारला हवे असलेलेच प्रश्न विचारता. हेच प्रश्न सरकारला का विचारत नाही? मंत्री बाहेर येऊन बोलत आहेत, पण पंतप्रधान अजून एकदाही संसदेत आलेले नाहीत. देशभरातील तरुण रस्त्यावर उतरून इतके मोठे आंदोलन करत आहेत, तरीही पंतप्रधानांनी याबाबत संसदेत एक शब्दही बोललेला नाही, आणि तुम्ही मला विचारता की संसद का चालत नाही?’

सरकारला प्रश्न विचारा

पुढे बोलताना त्यांना म्हटले की, ‘मला विचारा, विद्यार्थ्यांसाठी काय केले जात आहे? त्यांच्या मागण्यांवर सरकार कोणती पावले उचलत आहे? हे प्रश्न तुम्ही विचारायला हवेत. आणि जेव्हा मंत्री माध्यमांसमोर येतात, तेव्हा त्यांनाही विचारा की तुम्ही राजीनामा कधी देणार? हा प्रश्न तुम्ही विचारला का? केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तुम्ही विचारले का की ते राजीनामा कधी देणार आहेत? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विचारले का की पोलिसांनी लाठीमार का केला? इतके विद्यार्थी रुग्णालयात का दाखल झाले? आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे त्यांच्या पालकांशीही संपर्क साधता आला नाही, याचे कारण काय? राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) का लागू करण्यात आला? हे विद्यार्थी दहशतवादी आहेत का? जेव्हा तुम्ही सरकारला हे प्रश्न विचारायला सुरुवात कराल, तेव्हा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईन.’ दरम्यान, आता संसदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर पुन्हा काँग्रेस सरकारला घेरण्याची शक्यता आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us