लोहगड प्रकरणानंतर ट्रेंड बदलला; पालक मुलांसाठी करताहेत 3 लाखांचा खर्च, कारण काय?
लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणानंतर पालक वर्गात भीती पसरली आहे. भावी सून किंवा जावयाची माहिती गुप्तहेरांकडून घेत आहेत.

पुण्याच्या लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्याकांडानंतर समाजात पसरलेली दहशत कायम असल्याचे समोर आलं आहे. देशाला हादरवणाऱ्या या प्रकरणामुळे आता लग्न जुळवण्याधी गुप्तहेरांकडून बॅकग्राऊंड तपासण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. पालक केवळ कुंडली आणि नातेवाईकांच्या माहितीवर अवलंबून राहत नाही. तर गुप्तहेरांकडूनही माहिती मिळवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. आता लग्न जुळवताना स्वभाव जुळण्याआधी भावी वर-वधूचा भूतकाळ आणि गुन्हेगारी बॅकग्राऊंड तपासण्याचा ट्रेंड अत्यावश्यक बनल्याचं पालकांकडून सांगितलं जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, मुंबई आणि आसपासच्या शहरांत खासगी गुप्तहेर संस्थांकडून लग्न जुळवण्याआधी सर्व चौकशी करण्याचा कल वाढला आहे. याबाबत अधिकृत सरकारी आकडेवारी हाती समोर आलेली नाही. मात्र, आता पालक लग्नाच्या बाबतीत कोणताही धोका पत्करण्यास तयार नसल्याचे समोर येत आहे. समाजात मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हेगारी वाढली आहे. देशातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे लग्नाआधी होणाऱ्या सून किंवा जावयाचा भूतकाळ तपसण्याचा कल वाढला आहे. यासाठी पालक 25 हजार ते 3 लाखापर्यंत खर्च करण्याची तयारी करत आहे.
आता क्षुल्लक कारणामुळेही लग्न मोडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. समाजात साखरपुडा झाल्यानंतरही लग्न मोडण्याच्या घटना घडल्याच्या समोर आल्या आहेत. काही जण किचिंत संशयावरूनही ठरवलेलं लग्न मोडताना दिसत आहे. याच प्रकारचे धोके टाळण्यासाठी पालक गुप्तहेरांचं सहकार्य करू लागले आहेत. लग्नानंतर कायदेशीर अडचणींना सामोरे जाण्यापेक्षा आधीच पालक सावधगिरी बाळगू लागले आहेत.
…अन् लग्न मोडलं
एका प्रकरणात भावी वधू कॉलेजमधील जुन्या मित्राच्या संपर्कात असल्यानेही साखरपुडा मोडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. होणाऱ्या वधूने केवळ मैत्री असल्याचेही सांगून लग्नास नकार देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दुसऱ्या प्रकरणात गुजरातमधील एका कुटुंबाने एका क्षुल्लक कारणामुळे होणाऱ्या जावयाशी संबंध तोडल्याचा प्रकार घडला आहे. मुलगा दररोज ऑफिसमधील एका महिला सहकाऱ्यासोबत ऑफिसच्या कॅबमधून प्रवास करायचा. परंतु दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा पुरावा आढळला नाही, त्यानंतर कुटुंबाने लग्न मोडलं आहे.