AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vande Bharat: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! राज्यातील ‘या’ शहराला 4 वंदे भारत ट्रेन मिळणार

पुणे शहराला रेल्वेकडून 4 वंदे भारत ट्रेन मिळणार आहेत. त्यामुळे पुणे शहराची हाय-स्पीड रेल्वे कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

Vande Bharat: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! राज्यातील 'या' शहराला 4 वंदे भारत ट्रेन मिळणार
Vande Bharat
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 16, 2025 | 4:17 PM
Share

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे शहराला रेल्वेकडून 4 वंदे भारत ट्रेन मिळणार आहेत. त्यामुळे पुणे शहराची हाय-स्पीड रेल्वे कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार आहे. या 4 वंदे भारत ट्रेनमुळे शेगाव, वडोदरा, सिकंदराबाद आणि बेळगाव जाणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे. या 4 वंदे भारत ट्रेनचे थांबे कोणत्या स्टेशनवर असतील बाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पुणे-शेगाव वंदे भारत ट्रेन

पुणे-शेगाव वंदे भारत या ट्रेनचे थांबे दौंड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना येथे असण्याची शक्यता आहे. धार्मिक यात्रेकरूंना या ट्रेनचा लाभ घेता येणार आहे. भाविकांचा प्रवास जलद आणि आरामदायी होणार आहे. पुण्यातून अनेक भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला जात असतात, अशा भाविकांसाठीच ही ट्रेन सुरु करण्यात आली आहे.

पुणे-वडोदरा वंदे भारत

पुणे-वडोदरा वंदे भारत ट्रेन लोणावळा, पनवेल, वापी, सुरत या ठिकाणी थांबण्याची शक्यता आहे. सध्याचा पुण्यावरून वडोदऱ्याला जाण्यासाठी 9 तासांचा वेळ लागतो, मात्र वंदे भारतने हा प्रवास 6 ते 7 तासांत होणार आहे. या ट्रेनमुळे व्यावसायिकांना खास फायदा होणार आहे. यामुळे मुंबई-पुणे-गुजरात कॉरिडॉरची कनेक्टिव्हिटी देखील सुधारणार आहे.

पुणे-सिकंदराबाद वंदे भारत

पुणे-सिकंदराबाद ही वंदे भारत ट्रेन दौंड, सोलापूर, गुलबर्गा येथे थांबण्याची शक्यता आहे. या वंदे भारतमुळे प्रवासाचा वेळ 2-3 तास कमी होणार आहे. ही नवीन ट्रेन व्यवसायिक, तांत्रिक आणि आयटी व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्र आणि तेलंगणामधील कनेक्टिव्हिटी मजबूत होणार आहे.

पुणे-बेळगाव वंदे भारत

पुणे-बेळगाव ही वंदे भारत ट्रेनचे सातारा, सांगली, मिरज येथे थांबण्याची शक्यता आहे. या ट्रेनमुळे कर्नाटकच्या उत्तरेकडील भागाचा पुण्याशी संपर्क वाढणार आहे. या ट्रेनमुळे प्रवाशांचे 2-3 तास वाचण्याची शक्यता आहे.

पुणे-नागपूर स्लीपर वंदे भारतही सुरु होणार

रेल्वे मंत्रालय सध्या स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पुणे आणि नागपूर दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरु केली जाणार आहे. यामुळे महाराष्ट्राची उपराजधानी आणि सांस्कृतीक राजधानी जोडली जाणार आहे. या स्लीपर ट्रेनमुळे दोन्ही शहरांमधील व्यवसायिक, विद्यार्थी आणि पर्यटकांना फायदा होणार आहे.

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...