AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! काँग्रेसचा बडा खासदार अमित शहांच्या भेटीला, आता काँग्रेस फुटणार? मोठी अपडेट काय?

Amit Shah : पंजाब काँग्रेसमध्ये नुकत्याच झालेल्या संघटनात्मक फेरबदलानंतर पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरीबाबत चर्चा सुरू झाली आहे. अशातच आता एका बड्या खासदाराने अमित शाह यांची भेट घेतली आहे.

मोठी बातमी! काँग्रेसचा बडा खासदार अमित शहांच्या भेटीला, आता काँग्रेस फुटणार? मोठी अपडेट काय?
Sukhjinder Singh Randhawa meets Amit ShahImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 04, 2026 | 4:01 PM
Share

काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदारांनी भाजपची वाट धरली होती, त्यानंतर टीएमसीच्या काही खासदारांनी वेगळा गट स्थापन करून NDA ला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता पंजाबमधील काँग्रेसचे काही खासदार आणि नेते भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. कारण पंजाब काँग्रेसमध्ये नुकत्याच झालेल्या संघटनात्मक फेरबदलानंतर पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरीबाबत चर्चा सुरू झाली आहे. अमरिंदर सिंह राजा वडिंग यांना प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवण्यात आल्याने माजी मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी नाराज झाले आहेत. तर एका बड्या खासदाराने अमित शाह यांची भेट घेतली आहे, त्यामुळे पंजाब काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे.

चन्नी यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक

पंजाबमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यापूर्वी चन्नी आणि समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. चन्नी यांच्या घरी सुमारे चार तास चाललेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला 60 हून अधिक नेते उपस्थित होते. त्यामध्ये नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या निवडणूक समित्यांतील अनेक सदस्य तसेच 20 हून अधिक विद्यमान आणि माजी आमदार सहभागी झाले होते. यात माजी मंत्री तृप्त राजिंदर बाजवा, सुखबिंदर सरकारिया, ओ. पी. सोनी, भरत भूषण आशू, परमिंदर पाल पिंकी यांच्यासह दिवंगत गायक सिद्धू मूसेवाला यांचे वडील बलकौर सिंह हेही उपस्थित होते.

खासदार सुखजिंदर सिंह रंधावा अमित शहांच्या भेटीला

पंजाब काँग्रेसमध्ये नाराजी असताना पक्षाच्या कोअर कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री आणि खासदार सुखजिंदर सिंह रंधावा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. रंधावा यांनी या भेटीला कोणताही राजकीय रंग नाही असं म्हणत ही भेट पूर्वनियोजित होती अशी माहिती दिली आहे. मात्र या पक्षातील नाराजी आणि राजकीय परिस्थितीचा विचार करता ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

चन्नी गटाच्या नाराजीवर रंधावा यांचे भाष्य

चन्नी गटाच्या नाराजीवर प्रतिक्रिया देताना रंधावा यांनी म्हटले की, ‘ही परिस्थिती दुर्दैवी आहे. इतक्या विस्तृत चर्चेनंतरही अशी वेळ का आली, याचा विचार होणे गरजेचे आहे. परिस्थिती तुम्ही समजत आहात तितकी गंभीर नाही. मात्र इतक्या बैठका झाल्यानंतरही काही नेते नाराज असणे दुर्दैवी आहे. या बदलांबाबत काँग्रेस निरीक्षक अजय माकन यांनी पक्षश्रेष्ठींना नेमका काय अहवाल दिला होता, याचे उत्तर तेच देऊ शकतात.’

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे