घरात अजगर दिसला.. तीन मित्रांनी अजगरासोबत केला थेट किळसवाणा प्रकार
Python Caught Cooked: केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात अजगराला पकडून, शिजवून त्याला खाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नेमकं काय घडलं आहे ते जाणून घ्या...

प्राण्यांचा शिकार करुन त्यांच्या अवयवाची तस्करी केली जाते ही तर सर्वांनाच माहित आहे. काही लोक शिकार केलेल्या प्राण्यांना शिजवून खातातही. पण काही ठराविक प्राणी असतात, पण तुम्ही अजगराची शिकार करुन त्याला शिजवून खाल्याचा प्रकार ऐकायला आहे का? पण असाच एक प्रसंग घडला आहे. हा प्रसंग परदेशात नाही तर भारतात घडला आहे. तीन लोकांनी फक्त अजगराची शिकार केली नाही तर त्याला चक्क शिजवून खाल्ले आहे.
केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे वन विभागाने अजगर पकडून, शिजवून खाल्ल्याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. ही घटना मन्नमंगलमजवळील चेरुकुन्नू परिसरात घडली. अटक केलेल्या आरोपींची ओळख जिन्सन जोस (३६), जिष्णू (३०) आणि विवेक (३०) अशी पटली आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री आरोपींच्या घराजवळ एक अजगर दिसला होता. असा आरोप आहे की, या तिघांनी काही मित्रांसोबत मिळून अजगर पकडला. त्यांनी कथितरित्या अजगराला शिजवून मांस खाल्ले असल्याचे म्हटले जात आहे.
पोलीस आरोपी आणि इतरांचा शोध सुरु
वन विभागाला एका गुप्त माहितीद्वारे या घटनेची माहिती मिळाली. माहिती मिळाल्यानंतर, मन्नमंगलम वन स्टेशनचे उपवन परिक्षेत्र अधिकारी एम. शाहजहान यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली. वन विभागाच्या पथकाने शनिवारी तिन्ही आरोपींना अटक केली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, अटकेनंतर तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. वन विभाग आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेत आरोपीसोबत उपस्थित असलेल्या इतर लोकांच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे.
अजगर हा इतका भलामोठा असतो की तोच माणसाला एका झटक्यात गिळेल, अशा भल्या मोठ्या प्राण्याची शिकार करणे आणि त्याला शिजवून खाणे म्हणजे खरंच धाडसी प्रकार आहे. आता या आरोपींना पकडल्यानंतर त्यांच्यावर काय गुन्हा ठोठावला जातोय हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
