AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-Russia | भारतीय शास्त्रज्ञांना मानलं, रशियाच्या फेकून देण्यालायक मिसाइलपासून बनवलं ‘महाअस्त्र’

India-Russia | 26 फेब्रुवारी 2019 रोजी भारताच्या आकाशात भारतीय आणि पाकिस्तानी फायटर विमानांमध्ये डॉग फाइट झाली. त्यावेळी भारताने R-73 मिसाइलनेच पाकिस्तानच F-16 विमान पाडलं होतं. आता यांचा काही उपयोग नाही, असं दिसू लागलं, त्यावेळी भारतीय वैज्ञानिकांनी या मिसाइलमध्ये सुधारणा केल्या.

India-Russia | भारतीय शास्त्रज्ञांना मानलं, रशियाच्या फेकून देण्यालायक मिसाइलपासून बनवलं 'महाअस्त्र'
Samar Air defence systemImage Credit source: IAF/ReviewVayu/Wikipedia
| Updated on: Feb 27, 2024 | 1:27 PM
Share

India-Russia | भारताने काही वर्षांपूर्वी रशियाकडून इंडियन एअर फोर्ससाठी R-73 आणि R-27 क्षेपणास्त्र विकत घेतलं होतं. हवेतून हवेत हल्ला करण्याची या क्षेपणास्त्रांची क्षमता होती. 26 फेब्रुवारी 2019 रोजी भारताच्या आकाशात भारतीय आणि पाकिस्तानी फायटर विमानांमध्ये डॉग फाइट झाली. त्यावेळी भारताने R-73 मिसाइलनेच पाकिस्तानच F-16 विमान पाडलं होतं. भारताने रशियाकडून विकत घेतलेली हीच R-73 आणि R-27 क्षेपणास्त्र जुनी होऊ लागली. त्यांची मुदत संपली. आता यांचा काही उपयोग नाही, असं दिसू लागलं, त्यावेळी भारतीय वैज्ञानिकांनी या मिसाइलमध्ये सुधारणा केल्या. आता भारताने जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांमध्ये ही मिसाइल बदलली आहेत.

या सिस्टिमचा समर एअर डिफेंस सिस्टम नाव दिलय. अलीकडे राजस्थान पोखरणमध्ये वायुशक्ति 2024 युद्धाभ्यास झाला. त्यावेळी जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राने आपली अचून मारक क्षमता दाखवली. समर मिसाइल ट्रकमधून लॉन्च केले जातात. समर मिसाइल 2982 km/hr च्या स्पीडने कुठल्याही हवाई टार्गेटला हिट करु शकतात. समर सिस्टिमच पूर्ण नाव सरफेस-टू-एयर मिसाइल फॉर एस्योर्ड रीटॅलिएशन आहे.

भारताने काय बदललं?

या मिसाइल सिस्टिमच संचालन वायुसेनेच BRD यूनिट करतं. समर सिस्टिम कुठल्याही हवाई टार्गेटला हिट करु शकतं. हेलिकॉप्टर आणि फायटर जेट्सवर अचूकतेने प्रहार करता येतो. याच्या लॉन्चरवरुन दोन मिसाइल डागण्याची व्यवस्था आहे. समर मिसाइलची रेंज 12 ते 40 किलोमीटर आहे. समर एअर डिफेंस सिस्टममध्ये दोन प्रकारच्या मिसाइल्स असतात. SAMAR 1 हे कमी पल्ल्याच हवेतून हवेत मारा करणार क्षेपणास्त्र होतं. त्यात भारताने बदल केलाय. आता याच मिसाइलने जमिनीवरुन हवेत मारा करता येतो. याच वजन 105 kg, लांबी 9.7 फूट, व्यास 6.5 इंच आणि 7.4 kg च वॉरहेड लागतं.

अशी भारताकडे हजारो मिसाइल्स होती

हे मिसाइल डागण्यासाठी वेगवेगळे लॉन्च ट्रक आहेत. समर-1 साठी अशोक लीलँड स्टॅलियन 4×4 ट्रक लागतो. समर-2 क्षेपणास्त्र डागण्यासाठी बीईएमएल टाट्रा टी 815 8×8 ट्रक लागतो. मूळची ही रशियन मिसाइल्स असून Vympel R-73E ची भारताकडे हजारो मिसाइल्स आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.