अंकिताच्या हत्येचं हेच एकमेव कारण; राहुल गांधींनी भाजप, आरएसएसला घेरले…

| Updated on: Sep 28, 2022 | 12:08 AM

भारतासारख्या ठिकाणी अंकिता भंडारीच्या हत्या होणे हेही देशासाठी लाजिरवाणी गोष्ट असल्याचे मत राहुल गांधी यांनी मांडले.

अंकिताच्या हत्येचं हेच एकमेव कारण; राहुल गांधींनी भाजप, आरएसएसला घेरले...
Follow us on

नवी दिल्लीः उत्तराखंडमधील प्रसिद्ध अंकिता भंडारी हत्या (Ankita Bhandari Murder) प्रकरणावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) निशाणा साधत गंभीर आरोप केले. राहुल गांधी यांनी मंगळवारी बोलताना म्हणाले की, उत्तराखंडमध्ये 19 वर्षीय रिसेप्शनिस्टची हत्या ही केवळ वेश्याव्यवसायात जाण्यास नकार दिला असल्यानेच तिची हत्या झाल्याचा आरोप केला गेला आहे. भाजपने काढून टाकलेले नेते विनोद आर्य यांचा मुलगा पुलकित आर्य याच्यावर अंकिता भंडारीची हत्या केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाबद्दल राहुल गांधी बोलताना म्हणाले की, जो देश आपल्या महिलांना दुय्यम स्थान देतो, अशी राष्ट्रं म्हणून अपयशी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

भाजप आणि आरएसएसची विचारधारा ही महिलांना वस्तू मानणारी आहे. त्यांच्याकडून महिलांना नेहमीच दुय्यम स्थान दिले गेले आहे, त्यामुळे उत्तराखंडमध्ये जे घडले ते अत्यंत लाजिरवाणे आणि निंदणीय असल्याचे मतही त्यांनी मांडले.

अंकिता भंडारीच्या हत्येबद्दल राहुल गांधी अंकिता भंडारीच्या हत्येबद्दल राहुल गांधी यांच्याकडून भाजप आणि आरएसएसवर जोरदार निशाणा साधण्यात आला. केरळमधील मलप्पुरम येथे भारत जोडो यात्रेदरम्यान ते बोलत होते.

अंकिता भंडारी हत्येप्रकरणी एसआयटीकडून कसून तपास केला जात आहे. एसआयटीची टीम आता रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवत आहे.

अंकिताचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला असून त्यामध्ये तिच्या मृत्यूचे कारण हे गुदमरुन आणि पाण्यात बुडून झाल्याचे सांगण्यात आले आहे.

मात्र तिच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर तो सार्वजनिक करण्याची मागणी तिच्या कुटुंबीयांनी केली आहे. हा अहवालही सोमवारी सायंकाळी उशिरा त्यांना उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यामुळेही वातावरण तापले होते.

एसआयटीच्या टीमने रिसॉर्टमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. घडलेल्या ठिकाणी जाऊन पुरावे गोळा केले गेले आहेत.

त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना आता रिमांडवर घेण्याची तयारी सुरू केली गेली आहे. खून प्रकरणातील मुख्य आरोपी पुलकित आर्यसह अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना एसआयटीने रिमांडवर घेण्याचीही तयारी केली आहे.